बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
annual film festival held in Busan, South Korea | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चित्रपट महोत्सव, संस्था | ||
---|---|---|---|
स्थान | बुसान, Busan Cinema Center, दक्षिण कोरिया | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव किंवा बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (BIFF, पूर्वी पुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, PIFF) हा दक्षिण कोरियाच्या बुसान (पुसान देखील म्हणतात), दक्षिण कोरिया येथे दरवर्षी आयोजित केला जाणारा एक चित्रपट महोत्सव आहे. हा आशियातील सर्वात लक्षणीय चित्रपट महोत्सवांपैकी एक मानला जातो. [१] १३ ते २१ सप्टेंबर १९९६ या कालावधीत आयोजित केलेला पहिला महोत्सव हा कोरियातील पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव देखील होता.
या महोत्सवाचे मुख्य केंद्र नवीन चित्रपट आणि नवीन दिग्दर्शक, आणि मुख्यतः आशियाई देशांतील चित्रपटांची ओळख करून देणे हा आहे. आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे हा महोत्सव तरुणांना आकर्षित करतो आणि मोठ्या प्रमाणात तरुण प्रेक्षक प्रतिभेचा विकास आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नांद्वारे या महोत्सवाशी जोडले जातात. १९९९ मध्ये नवीन संचालकांना निधी स्रोतांशी जोडण्यासाठी पुसान प्रोत्साहन योजना स्थापन करण्यात आली. २०११ मधील १६ व्या महोत्सवात हा उत्सव सेंटम सिटीमधील बुसान सिनेमा सेंटर या नवीन कायमस्वरूपी इमारतीमध्ये हलविण्यात आला. [२] [३]
अधिकृत कार्यक्रम विभाग
[संपादन]बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा विविध विभागांमध्ये आयोजित केला जातो :
- गाला सादरीकरण : या विभागात नवीन चित्रपट आणि प्रदर्शने दाखवले जातात.
- आशियाई चित्रपट खिडकी (ए विंडो ऑन एशियन सिनेमा) : आशियाई चित्रपट निर्मात्यांद्वारे नवीन आणि/किंवा प्रातिनिधिक चित्रपटांचे प्रदर्शन.
- नवप्रवाह (न्यू करंट्स) : आशियाई सिनेमाच्या भावी दिग्दर्शकांचे पहिले किंवा दुसरे वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट दाखवणारा एकमेव आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभाग.
- आजचा कोरियन सिनेमा : निवडक कोरियन वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट पॅनोरमा आणि व्हिजन या दोन उपविभागांमध्ये दाखवले जातात. हे दोन उपविभाग कोरियन सिनेमाचा सध्याचा उत्पादन प्रवाह ओळखतात आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याची अपेक्षा करतात.
- पूर्वलक्षी कोरियन सिनेमा : विशिष्ट उल्लेखनीय दिग्दर्शकाचे चित्रपट किंवा महत्त्वपूर्ण विषय असलेले चित्रपट दाखवून कोरियन चित्रपटाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणे.
- जागतिक चित्रपट : जागतिक चित्रपटातील अलीकडील प्रवाह समजून घेण्यास मदत करणाऱ्या चित्रपटांसह चित्रपट निर्मात्यांद्वारे नवीन कामांचे सादरीकरण.
- विस्तृत कोन (वाइड अँगल) : लघुपट, अॅनिमेशन, माहितीपट आणि प्रायोगिक चित्रपट दाखवणारा विभाग.
- खुले चित्रपट (ओपन सिनेमा) : मोकळ्या जागेतील सादरीकरण (आउटडोअर स्क्रिनिंग) स्थळ जेथे नवीन चित्रपटांचा संग्रह, कला या दोहोंचे संयोजन दाखवले जाते.
- पुढील काळातील चित्रपट (फ्लॅश फॉरवर्ड विभाग) : हा विभाग गैर-आशियाई देशांमधील नवीन आणि येणाऱ्या चित्रपट निर्मात्यांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या चित्रपटांचा संग्रह आहे.
- मध्यरात्रीची आवड (मिडनाईट पॅशन) : विविध शैलीतील चित्रपट.
- विशेष कार्यक्रम : विशिष्ट उल्लेखनीय दिग्दर्शक किंवा शैलीतील चित्रपटांचे पूर्वलक्षी आणि विशेष प्रदर्शन.
संदर्भ
[संपादन]- ^ "Pusan International Film Festival (2018)". IMDb.
- ^ "Busan International Film Festival faces competition - Junotane". 31 March 2012. 31 March 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "KANG Soo-yeon, Co-director of BIFF Organization Committee, Finally Speaks". www.koreanfilm.or.kr.