बफेलो, वायोमिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बफेलो अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील छोटे शहर आहे. जॉन्सन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ४,५८५ होती.

शेती आणि पर्यटन या गावातील मुख्य व्यवसाय असून २०१०च्या दशकात येथून जवळ सापडलेल्या मिथेन वायूच्या साठ्यांमुळे त्याच्याशी निगडीत व्यवसायही सुरू झालेले आहेत.