बी. रघुनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फुलारी या पानावरून पुनर्निर्देशित)

भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ फुलारी ऊर्फ बी. रघुनाथ (२५ ऑगस्ट, १९१३ - ७ सप्टेंबर, १९५३) हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी आणि लेखक होते.

बी. रघुनाथ यांचा जन्म २५ ऑगस्ट, इ.स. १९१३ रोजी मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील सातोना या गावी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर ते वयाच्या १४व्या वर्षी शिक्षणासाठी हैदराबादला गेले. तिथे ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हते. त्यामुळे ते सरळ इ.स. १९३२ साली परभणीत सरकारी बांधकाम विभागात कारकून म्हणून लागले.[१]

बी.रघुनाथ यांनी इ.स. १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला. त्यांची पहिली कविता हैदराबाद येथील "राजहंस" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिद्ध झाली. नंतर मात्र त्यांनी बी.रघुनाथ या नावाने लेखन केले.

मृत्यू[संपादन]

आपल्या कार्यालयात काम करीत असतानाच बी.रघुनाथ यांचे ७ सप्टेंबर, इ.स. १९५३ रोजी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले.

प्रकाशित साहित्य[संपादन]

बी. रघुनाथ यांनी इ.स. १९३० ते इ.स. १९५३ या तेवीस वर्षाच्या काळात एकूण १५ पुस्तके लिहिली.

काव्यसंग्रह [ संदर्भ हवा ][संपादन]

  • आलाप आणि विलाप(१९४१)
  • पुन्हा नभाच्या लाल कडा(१९५५)

कथासंग्रह [ संदर्भ हवा ][संपादन]

  • साकी (इ.स. १९४०)
  • फकिराची कांबळी (इ.स. १९४८)
  • छागल (इ.स. १९५१)
  • आकाश (इ.स. १९५५)
  • काळीराधा (इ.स. १९५६)

कादंबऱ्या [ संदर्भ हवा ][संपादन]

  • ओ॓ (इ.स. १९३६)
  • हिरवे गुलाब (इ.स. १९४३)
  • बाबू दडके (इ.स. १९४४)
  • उत्पात (इ.स. १९४५)
  • म्हणे लढाई संपली (इ.स. १९४६)
  • जगाला कळले पाहिजे (इ.स. १९४९)
  • आडगांवचे चौधरी (इ.स. १९५४)

संकीर्ण [ संदर्भ हवा ][संपादन]

  • अलकेचे प्रवासी (स्फुट लेख-संग्रह, इ.स. १९४५)

गाजलेले साहित्य[संपादन]

कविता [ संदर्भ हवा ][संपादन]

  • अन्‍नदेवा
  • आज कुणाला गावे?
  • उन्हात बसली न्हात
  • कशाला मुखी पुन्हा तांबुल?
  • घन गरजे
  • चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली
  • ज्वार
  • टिचकी
  • ती तुमच्यावर हसली रे
  • तुजवर लिहितो कविता साजणी
  • ते न तिने कधि ओळखले
  • दुपार
  • नेस नवी साडी
  • पडली बघ झाकड
  • पांढऱ्या पाऱ्या या
  • पानझड
  • पुन्हा नभाच्या लाल कडा
  • मुद्रिका
  • मुलीस आला राग
  • या जगताची तृषा भय़ंकर
  • रस्ता नागर झाला
  • राव अधिकारी झाले
  • लहर
  • सांज
  • स्वस्त्धान्याचे दुकान

लघुकथा [ संदर्भ हवा ][संपादन]

  • आकाश
  • काळी राधा

संदर्भ[संपादन]