शाहीर प्रभाकर
Appearance
(प्रभाकर जनार्दन दातार या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रभाकर जनार्दन दातार (जन्म : गंगापूर (नाशिक जिल्हा-महाराष्ट्र, इ.स. १७५५; - इ.स. १८४३) हा मराठी लावणीकार होता.
तो मुरुड या गावचा राहणारा. त्याने पेशवाईचा उत्कर्ष आणि अपकर्ष दोन्हीही पाहिले. २०-२२ व्या वर्षी तो पुण्यात दाखल झाला व नंतर गंगू हैबतीच्या फडात प्रभाकरच्या कवनांनी तो काळ गाजविला त्याच्या कवनांत उत्तान श्रुंगार आढळतो. या कवनांचा संग्रह १९२०मधे प्रसिद्ध झाला. त्याने एकूण १३ पोवाडे व ११९ लावण्या लिहिल्या. माधवराव पेशवे यांचा 'रंग' आणि त्यांचा 'मृत्यू' यासंबधीचे त्याचे पोवाडे प्रसिद्ध आहेत. त्याचा सवाई माधवरावांचा पोवाडा करुणरसाचा उत्कट अविष्कार करतो.
शाहीर प्रभाकरवरील मराठी पुस्तके
[संपादन]- प्रभाकरकृत कविता : पदे, पोवाडे, लावण्या (वि.का. राजवाडे)