Jump to content

संवाद प्रतिमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रतिमान या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रतिमान म्हणजे काय?

[संपादन]

समाजविज्ञानात प्रतिमानचा शोध म्हणजे सामाजिक प्रक्रियेचे स्वरूप कसे असते याचे ते अंदाजात्मक वर्णन असते याद्वारे संज्ञापन प्रकिया म्हणजे काय?संज्ञापन पद्धत कशी असते हे समजणे शक्य होते. ही संपूर्ण प्रक्रियामधून वर्तविता येते. सर्वसाधारणपणे प्रतिमान हे आकृतीद्वारे मांडले जाते. या आकृतीद्वारे संज्ञापनातील विविध घटनांमध्ये समाविष्ट घटक असतात. त्या घटकातील परस्पर सहसंबंध अभ्यासला जातो.प्रतिमान हे स्पष्टीकरण आणि विश्‍लेषणाचे साधन असते. प्रतिमान म्हणजे सत्याचे प्रतिपादन नव्हे तर केवळ त्या संदर्भात केलेल्या संशोधनातून आणि चाचण्यांमधून आलेल्या शक्यता असतात. त्यानंतर या प्रतिमानचा विकास होवून त्याचे सिद्धांतात रूपांतर होवू शकते.

प्रतिमानाची विविध रूपे

[संपादन]
  1. आराखडा
  2. मौखिक
  3. संख्यात्मक

प्रतिमानांचा उपयोग करण्यापूर्वी तसेच एखाद्या भौतिक परिस्थितीचा अभ्यास करण्यापूर्वी एखाद्या विशिष्ठ प्रतिमानांचा वापर करण्यामागे निश्‍चित कारण काय? याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. प्रतिमानात एखाद्या वस्तूमधील वैशिष्ट्ये स्पष्ट करण्याची आणि ही वैशिष्ट्ये परस्परांशी कशी निगडीत आहेत? याचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता असते.

प्रतिमानची कार्ये

[संपादन]

प्रतिमानच्या निर्मितीचा मुख्य उद्देश म्हणजे महत्त्वाच्या सिद्धांत निर्मितीस मदत करणे. १) वर्णनात्मक कार्य - एखाद्या विशिष्ठ स्वरूपाच्या वर्तनाच्या स्वरूपात सिद्धांत नसला किंवा अपूर्ण स्वरूपात सिद्धांत असला म्हणजे त्या वर्तनाची माहिती देण्यासाठी प्रतिमानची बांधणी केली जाते. प्रतिमानाद्वारे अचूक आणि निश्‍चित स्वरूपात वर्णन करता येते. २) स्पष्टीकरणात्मक कार्य - अस्तित्वात असलेल्या सिद्धांतातील अविकसीत संकल्पनाबद्दल प्रतिमाने स्पष्टीकरण देण्याचे कार्य करते. सापेक्षपणे अविकसीत सिद्धांतातील संकल्पनाबद्दल तंतोतंत व्याख्या तयार करण्याचे कार्य प्रतिमानद्वारे शक्य होते. ३) अनेक वर्णसमीरणाचे कार्य - संकल्पनामधील समाविष्ट प्रक्रियेतील अनेक वर्ण समीकरणांची मांडणी करण्याचे कार्य प्रतिमान करत असतात. ४) मापनात्मक कार्य प्रतिमान - प्रतिमानची निर्मिती ही प्रामुख्याने एखाद्या प्रक्रियेतील वा भौतिक वस्तूतील प्रतिनिधित्व करणाऱ्या समान गुणवैशिष्ट्यांचे मापन करण्यासाठी आणि सापेक्ष विधानांचे तसेच सुप्त वैशिष्ट्यांची जोपासना करण्यासाठी केली जाते. ५) संकल्पनात्मक कार्य - ही माध्यमातील बदल ध्वनीत करतात. गणिती प्रतिमानांची स्वतःची भाषा शब्दसंग्रह आणि वाक्यरचनेचे आपापले नियत असतात. प्रतिमानाची भाषा चिन्हात आणि नेहमीच्या भाषा चिन्हात फरक असतो. रचनात्मक प्रतिमाने ही त्रिमीतीची साधने असतात.

प्रतिमानात्मक मर्यादा

[संपादन]
  1. गुंतागुंतीच्या घटनेचे अति सोपे स्वरूप केल्याने दिशाभूल होण्याची शक्यता असते.
  2. अचूकतेच्या अभावी तंतोतंत स्वरूपातील समज गमावला जातो.
  3. अयोग्य घटनेसाठी उपयोग केल्याने घटनेपेक्षा प्रतिमानाबद्दलच माहिती मिळते.
  4. काही साध्या घटना अत्यंत गुंतागुंतीच्या आहेत असा समज होण्याची शक्यता असते.
  5. सज्ञापन प्रतिमाने ही संवाद प्रक्रियेची दुश्यचित्र होत.

शब्दसंग्रह म्हणजे काय?