पेंटॅगॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पेंटागॉन या पानावरून पुनर्निर्देशित)

द पेंटॅगॉन (इंग्लिश भाषा: The Pentagon) हे अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेचे मुख्यालय आहे. पेंटॅगॉन राजधानी वॉशिंग्टन डी.सी.च्या जवळ व्हर्जिनिया राज्यातील अर्लिंग्टन ह्या शहरात आहे. पेंटॅगॉन इमारतीचे उद्घाटन १५ जानेवारी १९४३ रोजी करण्यात आले. नावानुसार ह्या इमारतीचा आकार पंचकोनी आहे.

पेंटॅगॉन ही एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी इमारत आहे. २८.७ एकर जमीन ह्या इमारतीने व्यापली आहे. येथे २६,००० लष्करी व सरकारी अधिकारी काम करतात.