Jump to content

पुणे विद्यार्थी गृह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुणे अनाथ विद्यार्थी गृह या पानावरून पुनर्निर्देशित)

पुणे विद्यार्थी गृह ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. दादासाहेब केतकर यांनी १९०९ साली या संस्थेची सुरुवात केली.[][]

पुणे विद्यार्थी गृह
अध्यक्ष सुनील रेडेकर
स्थापना १२ मे १९०९
मुख्यालय पुणे
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

इतिहास

[संपादन]

पुणे (अनाथ) विद्यार्थी गृहाची स्थापना 12 मे 1909 रोजी झाली.[] संस्थेची सुरुवात पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमण्या गणपतीजवळच्या भट ‘वाडा’मध्ये अगदी लहानश्या जागेत झाली. संस्थेचे संस्थापक दादासाहेब केतकरांनी आपले संपूर्ण आयुष्य संस्थेच्या विकासासाठी समर्पित केले[]. त्यांच्या नंतर संस्थेचे माजी विद्यार्थी गजानन श्रीपत उर्फ अण्णासाहेब खैर हे त्यात सामील झाले.[ संदर्भ हवा ] त्यांच्या अथक योगदानाने संस्था मोठी होत गेली. १९२१ मध्ये दादासाहेब केतकर, अण्णासाहेब खैरे आणि नानासाहेब परुळेकर यांच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्र विद्यालय’ ही शाळा स्थापन झाली.[ संदर्भ हवा ]

संस्था कॅम्पस

[संपादन]

पुणे - मुख्यालय

[संपादन]
  • महाराष्ट्र विद्यालय
  • फाटक तंत्र निकेतन
  • सदाचार विद्यार्थी वसतिगृह

पुणे - मुक्तागंण परिसर

[संपादन]
  • पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय,विद्यानगरी परिसर
  • मुक्तांगण बालरंजन केंद्र
  • अभियांत्रिकी विद्यार्थी वसतिगृह

मुंबई

[संपादन]

म्हसरूळ[]

[संपादन]
  • कै. डॉ. एस. व्ही. ऊर्फ काकासाहेब देवधर इंग्रजीमाध्यम शाळा (पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा)

नाशिक[]

[संपादन]
  • पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक
  • पुणे विद्यार्थी गृह व्यवस्थापन संस्था, नाशिक
  • महाराष्ट्र विद्यालय, पंचवटी
  • विद्यार्थी वसतिगृह, पंचवटी

नेरुळ

[संपादन]

तळेगाव

[संपादन]

संचालक मंडळ

[संपादन]

हनुमंत भोसले

कृष्णाजी कुलकर्णी

रमेश कुलकर्णी

राजेंद्र कांबळे

संदर्भ

[संपादन]
  1. ^ वृत्तसेवा, प्रभात (2021-10-16). "विविधा : दादासाहेब केतकर". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2022-08-31 रोजी पाहिले.
  2. ^ "पुण्यातील अनाथ विद्यार्थी गृहाचा आताचे पुणे विद्यार्थी गृह वर्धापनदिन". www.bytesofindia.com. 2022-08-31 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "An Earnest Appeal – Pune Vidyarthi Griha, 1786, Sadashiv Peth, Pune 411030 Maharashtra India". www.punevidyarthigriha.org. 2022-08-30 रोजी पाहिले.
  4. ^ "केतकर, विष्णू गंगाधर". महाराष्ट्र नायक (इंग्रजी भाषेत). 2022-08-31 रोजी पाहिले.
  5. ^ "Mhasrul – Pune Vidyarthi Griha, 1786, Sadashiv Peth, Pune 411030 Maharashtra India". www.punevidyarthigriha.org. 2022-08-30 रोजी पाहिले.
  6. ^ "Nashik – Pune Vidyarthi Griha, 1786, Sadashiv Peth, Pune 411030 Maharashtra India". www.punevidyarthigriha.org. 2022-08-30 रोजी पाहिले.