पी.एम. सईद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पी. एम. सईद या पानावरून पुनर्निर्देशित)


पी.एम. सईद (मे १०, इ.स. १९४१ - डिसेंबर १०, इ.स. २००५ ) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९६७, इ.स. १९७१, इ.स. १९७७, इ.स. १९८०, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये लक्षद्विप लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते १२ व्या आणि १३ व्या लोकसभेचे उपाध्यक्ष होते. तसेच मे इ.स. २००४ ते डिसेंबर इ.स. २००५ या काळात मनमोहन सिंह यांच्या मंत्रीमंडळात उर्जामंत्री होते.