महाराष्ट्रातील नाट्यगृहांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पिंपरी-चिंचवड मधील नाट्यगृहे या पानावरून पुनर्निर्देशित)

पिंपरी-चिंचवड[संपादन]

पिंपरी-चिंचवड महानगरामध्ये एकूण चार नाट्यगृह आहेत. त्यापैकी काही नाट्यगृह सुरळीत सुरू आहेत आणि काही नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू आहे.[१]

प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह[संपादन]

या नाट्यगृहाची निर्मिती प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या संकल्पनेतून सन १९९६ मध्ये झालेली आहे सुरुवातीला या नाट्यगृहाचे नाव पिंपरी-चिंचवड प्रेक्षागृह असे होतं. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतरनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या नाट्यगृहाचे नामांतर प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह असे केलेलं आहे.[२]

आचार्य अत्रे रंगमंदिर[संपादन]

हे नाट्यगृह संत तुकाराम नगर मध्ये आहे. या नाट्यगृहाची निर्मिती २००२ मध्ये झालेली आहे. या नाट्यगृहामध्ये आसनक्षमता ६०० इतकी आहे.[३]

अंकुशराव लांडगे नाट्यगृह[संपादन]

हे नाट्यगृह भोसरी मध्ये आहे. या नाट्यगृहाची निर्मिती २०१० मध्ये झालेलं आहे. पण हे नाट्यगृह २०११ मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. या नाट्यगृहाची साडेनऊशे आसन क्षमता इतकी आहे.[४]

नटसम्राट निळू फुले नाट्यगृह[संपादन]

हे नाट्यगृह पिंपळे गुरव येथे आहे. या नाट्यगृहाची निर्मिती २०१७ मध्ये करण्यात आलेली आहे. या नाट्यगृहाची साडेपाचशे आसन क्षमता इतकी आहे.[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "नाट्यगृहांच्या उत्पन्नाची गाडी रुळावर, शनिवार, रविवार बुकिंग फुल; इतर दिवशीही कार्यक्रमांची रेलचेल". pudhari.news (Marathi भाषेत). 4 June 2022. Archived from the original on 1 November 2022. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "रामकृष्ण मोरे नाट्यगृहाने टाकली कात;अत्याधुनिक ध्वनियंत्रणा, प्रकाश योजना, अग्निशामक अन् इमारतीचे नूतनीकरण". Lokmat.com (Marathi भाषेत). 2 August 2018. Archived from the original on 31 October 2022. 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "आचार्य अत्रे रंगमंदिरात". esakal.com (Marathi भाषेत). 7 May 2022. Archived from the original on 1 November 2022. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "लांडगे नाट्यगृहात सीसीटीव्ही बसविणार". esakal.com (Marathi भाषेत). 22 February 2018. Archived from the original on 1 November 2022. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत नटसम्राट निळू फुले रंगमंदिर". pudhari.news (Marathi भाषेत). 29 July 2022. Archived from the original on 1 November 2022. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)