पावनखिंड (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पावनखिंड - कादंबरी या पानावरून पुनर्निर्देशित)
पावनखिंड (कादंबरी)
लेखक रणजित देसाई
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रथमावृत्ती ३ मार्च १९८१
चालू आवृत्ती डिसेंबर, २००२
मुखपृष्ठकार रवींद्र मेस्त्री
पृष्ठसंख्या १६८
आय.एस.बी.एन. ८१-७७६६-१८३-३

पुस्तकाविषयी[संपादन]

पावनखिंड ही रणजित देसाई यांची शेवटची ऐतिहासिक कादंबरी. १९६० नंतरच्या ऐतिहासिक कादंबरीच्या परंपरेतील वेगळी कादंबरी लिहिण्याचा हेतू मनात धरून देसाईंनी ही कादंबरी लिहीली.

बाजीप्रभू देशपांडेनी प्राण पणाला लावून घोडखिंड लढवली आणि राजांचे प्राण वाचवले. बाजींनी स्वराज्यासाठी आपल्या निष्ठा आणि पराक्रमाच्या साहाय्याने घोडखिंडीची पावनखिंड बनवली.

बाजींच्या दैदिप्यमान देशभक्तीचे, अतुलनीय शौर्याचे, वीरश्रीपूर्ण चित्रण या कादंबरीमध्ये आढळते. या कादंबरीतील स्थळांचे, गडाच्या परिसरातील धामधुमीचे, लढायांचे, जय-पराजयाच्या निमित्ताने पहावयास मिळणाऱ्या आशा-निराशांचे चित्रण योग्य वातावरणनिर्मिती करते. या पार्श्वभूमीवर बाजीप्रभूंच्या वीरमरणाचे करुणरसपूर्ण वर्णन कादंबरीची रसक्ता आणि भावपूर्णता वाढवत नेते. वाक्प्रचार, म्हणी, स्वगत आणि सूचक व नाट्यपूर्ण अर्थाने भरलेले संवाद हे या पुस्तकाचे विशेष जाणवणारे वैशिष्ट्य.

शिवशाहीतील पराक्रमी पुरूषावर लिहीली गेलेली मराठीतील पहिली कादंबरी.