पाडुका, केंटकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Broadway - Paducah, Kentucky.jpg

पाडुका अमेरिकेच्या केंटकी राज्यातील छोटे शहर आहे. हे शहर मॅकक्रॅकेन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१६च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २५,१४५ होती.

पाडुका ओहायो नदी आणि टेनेसी नदी तसेच ओहायो आणि कंबरलॅंड नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.

१८२१मध्ये येथे पहिली युरोपीय वसाहत झाली. त्यावेळी त्याचे नाव पेकिन होते. युरोपीय लोक येथे येण्यापूर्वी चिकासॉ जमात या प्रदेशात राहत होती.