Jump to content

साडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पदर या पानावरून पुनर्निर्देशित)
आसाम राज्याची पारंपरिक साडी

साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र आहे.[१] ही जवळजवळ ५ ते १० वार लांबीची असून तो शिवण नसलेल्या वस्तराचा एक लांबट आयताकार तुकडा असतो. साडी ही कमरेला लपेटली (नेसली) जाते. कमरेवरच्या भागावर पोलके (ब्लाऊज) किंवा चोळी (झंपर) घालतात. कोणतीही स्त्री साडीमध्ये सुंदर दिसते. साडी ही वेगवेगळ्या कापडांच्या प्रकारात उपलब्ध असतात.

प्राचीन ब्रज-मथुरा आणि द्रविडीय परिवारातील स्त्री शिल्पकला अँजेलो २ रे शतक

निऱ्या

[संपादन]

साडी कमरेभोवती गुंडाळल्यावर जास्तीचा राहिलेला भाग घड्या घालून नाभीपाशी खोचला जातो त्याला निऱ्या म्हणतात.

साडीचा जमिनीकडे असणारा तळाचा भाग म्हणजे साडीचा काठ होय. साडीच्या काठावर असणाऱ्या विवक्षित नक्षीमुळे काही साड्यांचे प्रकार सहज ओळखता येतात.

कमरेला गुंडाळल्यावर उरणाऱ्या साडीच्या आकर्षक तुकड्याला साडीचा पदर, पालव किंवा पल्लू म्हणतात. हा भाग खांद्यावर किंवा डोक्यावर घेतात. काहीजणी त्याला समोरच्या बाजूनेही घेतात. पदराची जास्तीची लांबी कबरेभोवती लपेटतात व उरलेली कमरेशी खोचतात.

प्रकार

[संपादन]

भारतातील स्त्रिया वापरतात त्या साडीचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारांची नावे साडीच्या रचनेवरून, काठावरून वा तिच्यात वापरलेल्या मालावरून पडतात, तर काही त्या विवक्षित साड्या कुठे बनतात त्या गावाच्या किंवा राज्याच्या नावावरून आहेत. साड्यांची लांबी बेबीसाडी(चारवारी), पाचवारी किंवा गोल साडी, सहावारी किंवा दंडिया, नऊवारी किंवा दहावारी असते. नाशिकच्या सप्तशृंगी देवीला ११ वार साडी लागते. साडीपन्हा हा बेबीसाडी सोडल्यास बहुधा १.२ मीटर, पण क्वचित कमी किंवा जास्त (१.५ मीटर) असतो. साडीला जोडलेला ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीसची रुंदी ४४ सेंटिमीटर ते ११२ सेंटिमीटर असते. कापडाच्या मोठ्या गुंडाळीतून कापून मिळालेल्या हव्या त्या लांबीच्या साडीला वायल म्हणतात.


साडीचे प्रकार (दीडशेहून अधिक)

[संपादन]
  • अर्धरेशमी
  • ऑरगंडी
  • ऑरगेंझा साडी
  • रुंद काठाची साडी
  • काठा पदराची साडी
  • कोयरीकाठी साडी
  • क्रेप प्रिंटिंगची साडी
  • खडीकामाची
  • गर्भरेशमी
  • चिटाची
  • चिनार
  • चौकटीची साडी
  • छापाची साडी (प्रिंटेड साडी)
  • जरतारी साडी
  • जरीपदरी साडी
  • जरीचे काठ असलेली साडी
  • जाडी भरडी
  • जोडाची साडी (खानदेश)
  • टमटम साडी
  • ठिपक्याची साडी
  • तलम साडी
  • तुकडा साडी
  • दंडिया (सहावारी साडी)
  • नऊवारी साडी
  • नायलॉनची साडी
  • पट्ट्यापट्ट्याची साडी
  • पाचवारी साडी
  • पावडा साडी (हाफ साडी) (तामिळनाडू)
  • प्लॅस्टिक जरीची
  • प्लेन एकरंगी किंवा बहुरंगी साडी
  • बांधणी (राजस्थानी-गुजराती)
  • वायल
  • रुंद पदराची साडी
  • रेशमी साडी
  • कृत्रिम रेशमी साडी
  • लखनौ चिकन साडी
  • सहावारी साडी (दंडिया)
  • सुती साडी
  • सुरतेची साडी
  • सेलम साडी
  • हातमागाची साडी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Division, Publications. Yojana October 2021 (Marathi): A Development Monthly. Publications Division Ministry of Information & Broadcasting.