दांडपट्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पट्टा (शस्त्र) या पानावरून पुनर्निर्देशित)
दमिश्क पोलादापासून बनवलेला ४१ इंची (१०४ सें.मी.) लांब पात्याचा दांडपट्टा

दांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते मुठीवर चढवता येणाऱ्या चिलखती हातमोजास जोडलेले असते. चिलखती हातमोजा मूठ व कोपरापासून पुढचा हात झाकेल, अश्या बनावटीचे असते. जवळच्या अंतरावरून हातघाईच्या लढाई लढताना याचा वापर केला जाई. विशेषकरून मराठ्यांच्या पायदळाने अनेक युद्धमोहिमांत याचा परिणामकारक वापर केला.

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

१. एका हाताचा दांडपट्टा कसा चालवितात त्याचे प्रात्यक्षिक दाखविणारा व्हीडीओ

२. दोन्ही हाताचा दांडपट्टा कसा चालवितात त्याचे प्रात्यक्षिक दाखविणारा व्हीडीओ