नववा राम, थायलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भूमिपोन अदुल्यदे (मराठी लेखनभेद: भूमिपोल अतुल्यतेज, भूमिबोल अदुल्यदेज; थाई: ภูมิพลอดุลยเดช ; रोमन लिपी: Bhumibol Adulyadej ; शाही थाई लिप्यंतर: Phumiphon Adunyadet ;) (डिसेंबर ५, इ.स. १९२७ - हयात) हा थायलंडचा वर्तमान राजा आहे. सार्वजनिक जीवनात 'महाराज' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या याला नववा राम या नावानेही उल्लेखले जाते. ९ जून, इ.स. १९४६पासून राज्यारूढ असलेला नववा राम जगभरातील वर्तमान शासनप्रमुखांमध्ये सर्वाधिक काळ अधिकारारूढ शासनप्रमुख असून थाई इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ कार्यकाळ असलेला राजा ठरला आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.