Jump to content

लॅटिन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दैनंदित वापरातले काही लॅटिन वाक्प्रचार या पानावरून पुनर्निर्देशित)

लॅटिन भाषा (लिंग्वा लातिना) ही एक इटालिक भाषा आहे. हीचा उगम लॅटियमप्राचीन रोममध्ये झाला. रोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोपमध्यपूर्वेत वापरात आली.

इटालियन, फ्रेंच, कातालान, रोमेनियन, स्पॅनिशपोर्तुगीझ सारख्या रोमान्स भाषा लॅटिनपासून आल्या आहेत. इंग्लिशसह युरोपमधील इतर अनेक भाषांवर लॅटिनचा मोठा प्रभाव आहे. या भाषांच्या शब्दभांडारात बहुतांश शब्दांना लॅटिन मूळ असते. सतराव्या शतकापर्यंत लॅटिनला आंतरराष्ट्रीय ज्ञानभाषेचा दर्जा होता.

दैनंदिन वापरातील काही लॅटिन वाक्प्रचार

[संपादन]
तणावग्रस्त माणुसकी जर्मनीची कविता
युतीने: एका माणुसकी लेकींना बोलत आहे
  1. Ad hoc (ॲड हाॅक) = एका विवक्षित कामासाठी बनलेले किंवा केलेले.
  2. ad nauseam (ॲड नाॅसियम) = कंटाळा येईपर्यंत
  3. inter alia = इतर गोष्टींसह
  4. bona fide (बोना फाईड) = अस्सल
  5. circa = साधारणपणे त्या काळात
  6. de facto = खरे तर
  7. erratum = त्रुटी, चूक
  8. et cetera; etc = वगैरे वगैरे
  9. ex gratia = केवळ दयेपोटी
  10. habeas corpus = अटक केलेल्या माणसाला कोर्टासमोर हजर करण्याची आज्ञा.
  11. in situ = मूळ ठिकाणी
  12. parI pasu (पारी पासू ) = समान किंमतीचे, समान पायावर आधारित
  13. per = प्रत्येक
  14. per annum; p.a = दरसाल
  15. per capita = माणशी
  16. Per mensem = दरमहा
  17. persona non grata = नको असलेला माणूस
  18. post-mortem (पोस्ट माॅर्टेम) = मृत्यूचे कारण शोधण्यासाठी केलेले शवविच्छेदन
  19. pro rata = प्रमाणबद्ध, समान प्रमाणात
  20. Quid-pro-co (क्विड-प्रो-को) = कुठल्यातरी कामाकरिता काहीतरी मिळणे. देवाण घेवाण
  21. sine die = (सिने डाय) अनिश्चित काळासाठी
  22. sine qua non = आवश्यक परिस्थिती
  23. status quo = (स्टेटस को) जसेच्या तसे
  24. verbatim =(व्हर्बेटम) शब्दशः
  25. versus = (व्हर्सस) = (अमुक) विरुद्ध (तमुक)
  26. vice versa = (व्हाईसं व्हर्सा) आणि उलट