दक्षिण चिनी वाघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दक्षिण चीनी वाघ या पानावरून पुनर्निर्देशित)

दक्षिण चिनी वाघ-(Panthera tigris amoyensis) ही वाघांमधील सर्वात चिंताजनक प्रजाती आहे व वन्य अवस्थेत जवळपास नामशेषच झालेली आहे. १९८३ ते २००७ मध्ये एकही चिनी वाघ दृष्टीस पडला नाही. २००७ मध्ये एका शेतक-याने वाघ दिसल्याचे सांगितले[१]. माओंच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच चिनी औषधांसाठी ह्या वाघांची मोठ्या प्रमाणावर शिकार करण्यात आली. १९७७ मध्ये चिनी सरकारने या वाघाच्या शिकारीवर बंदी आणली पण तोवर खूप उशीर झाला होता. सध्या हे वाघ फक्त संग्रहालयात आहेत.

वर नमूद केल्याप्रमाणे केवळ २००७ मध्ये कित्येक वर्षाने एक वाघ दृष्टीस पडला होता. दक्षिण चिनी वाघ वन्य अवस्थेत नामशेषच झाल्याचे मानण्यात येत आहे. केवळ बंदीवासात व औषधांसाठी वाढवण्यात येणाऱ्या वाघांच्या फार्म्समध्ये हे वाघ शिल्लक आहेत. काही वन्य जीव संरक्षक मंडळींनी वन्य चिनी वाघाचे अस्तित्व पुन्हा जागृत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. त्यादृष्टीने बंदीवासात वाढलेल्या वाघांच्या पिल्लांना दक्षिण अफ्रिकेतील खाजगी जंगलात वाढवण्यात येत आहे. यात या वाघांना लहानपणीच कृत्रिम भक्ष्यांशी खेळवून शिकारी धडे देण्यात आले व स्वता: शिकार साधण्यात या वाघांना पारंगत केले गेले. [२]बहुधा सन २००८ मध्ये यांच्यापासून जन्मलेल्या पिल्लांना चीनमध्ये पुनर्वसन करण्यात येईल व वन्य चिनी वाघांचे पुन्हा पुनर्जीवन होईल अशी आशा आहे.


संदर्भ[संपादन]

  1. ^ http://news.bbc.co.uk/1/hi/world/asia-pacific/7042257.stm
  2. ^ Discovery channel documentary on Tigers rehabilitation in South Africa