त्रिंबक नारायण अात्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

त्रिंबक नारायण अात्रे (५ सप्टेंबर, इ.स. १८७२ - ? फेब्रुवारी, इ.स. १९३३) हे महाराष्ट्रातील ग्रामीण समाजाचे व मागासलेल्या जातिसंस्थांचे अभ्यासक होते. मुंबई विद्यापीठातून अात्र्यांनी पदवी घेतली व नंतर मुंबई सरकारच्या महसूल खात्यात अव्वल कारकून म्हणून नोकरीस प्रारंभ केला. पुढे अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी कामांवर खास अंमलदार म्हणून त्यांची नेमणूक झाली.

मुलकी खात्यात नोकरीला असल्याने अात्र्यांनी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांचे जवळून व बारकाईने निरीक्षण केले व ग्रामीण भागातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करून गावगाडा नावाचा ग्रंथ लिहिला.हा ग्रंथ १९१५ साली प्रसिद्ध करण्यात आला.

प्रामुख्या[१]ने शेतकरी आणि शेतीचे अर्थशास्त्र हा या पुस्तकाचा विषय आहे.गावगाडा मध्ये त्या काळची विशिष्ट लहेजा असलेली भाषा आहे. त्या काळाच्या अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांचा समावेश या पुस्तकात आहे.

काळी, पांढरी, खेडे, मौजे, कसबा पेठ. कुणबी इ. विषयांबद्दलची माहिती या पुस्तकात आलेली आहे.

  1. ^ गोखले, अरविंद (जून २०१८). "गावगाडा (शताब्दी आवृती)". राजहंस ग्रंथवेध. मे २०१६: पृष्ठे ३७ ते ३९.