Jump to content

कडू कवठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तुवरक या पानावरून पुनर्निर्देशित)
Hydnocarpus wightianus (es); Hydnocarpus wightianus (eu); Hydnocarpus wightianus (ast); Hydnocarpus wightianus (ca); Hydnocarpus wightianus (de); Hydnocarpus wightianus (sq); Hydnocarpus wightianus (bg); Hydnocarpus wightianus (ro); 大風子油 (ja); Hydnocarpus wightianus (ia); Hydnocarpus wightianus (ie); Hydnocarpus wightianus (uk); Hydnocarpus wightianus (la); Hydnocarpus wightianus (io); Hydnocarpus wightianus (fi); Hydnocarpus wightianus (eo); Hydnocarpus wightianus (an); চালমুগরা (bn); Hydnocarpus wightianus (fr); कडू कवठ (mr); Hydnocarpus wightianus (vi); Hydnocarpus wightianus (vo); Hydnocarpus wightianus (pt-br); Hydnocarpus wightianus (ceb); Hydnocarpus wightianus (war); Hydnocarpus wightianus (pl); Hydnocarpus wightianus (ga); Hydnocarpus wightianus (nl); Hydnocarpus wightianus (pt); Hydnocarpus wightianus (en); ಗರುಡಫಲ (kn); Hydnocarpus wightianus (ext); Hydnocarpus wightianus (gl); Hydnocarpus wightianus (ru); Hydnocarpus wightianus (oc); Hydnocarpus wightianus (it) species of plant (en); Art der Gattung Hydnocarpus (de); loài thực vật (vi); species of plant (en); вид рослин (uk); taxon (nl)
कडू कवठ 
species of plant
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारटॅक्सॉन
सामान्य नाव
Taxonomy
साम्राज्यPlantae
SubkingdomViridiplantae
InfrakingdomStreptophyta
SuperdivisionEmbryophytes
DivisionTracheophytes
SubdivisionSpermatophytes
OrderMalpighiales
FamilyAchariaceae
GenusHydnocarpus
SpeciesHydnocarpus wightianus
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कडू कवठ (कडवी कवठ, खष्ट, खैट, कौटी हिं, काष्टेल, कवा क. गरुडफळ, निरदिवित्तुलू लॅ. हिद्नोकार्पस लॉरिफोलियाकुल-फ्लॅकोर्टि एसी). सु. १२-१५ मी. उंच वाढणारा हा सदापर्णी वृक्ष उष्णकटिबंधातील दाट जंगलात व भारतात (पश्चिम घाटात, कोकणाच्या दक्षिणेस व घाटाखाली कारवार आणि मलबारात) दमट जागी, विशेषतः पाण्याजवळ आढळतो त्रावणकोरमध्ये सामान्यपणे ६२॰ मी. उंचीपर्यंत आढळतो. कोवळ्या भागांवर भुरी लव असते. पाने मोठी साधी, अंडाकृती किंवा लांबट भाल्यासारखी, टोकास निमुळती आणि चिवट फुले पांढरी, एकाकी किंवा मंजरीवर जानेवारी-एप्रिलमध्ये येतात. मृदुफळे कठीण, लवदार, लंबगोल, लिंबाएवढी बिया पुष्कळ, साधारणत: कोनयुक्त. कडू कवठ (चौल मोगरा)ची झाडे १५ ते ३० मीटर उंच, सदाहरित आणि मध्यम आकारमानाची असतात. त्यांच्या शाखा जवळजवळ गोलाकार व केसाळ असतात. खोडावरची साल भुरकट रंगाची, फटीयुक्त, खडबडीत असते. पाने सरळ, एकांतरित १० ते २२ सेंटिमीटर लांब आणि सुमारे ३ ते १० सेंटिमीटर रुंद गडद हिरव्या रंगाची असतात.

तुवरक वृक्षाचे फूल छोटे, सफेद व एकलिंगी असते.. फळे ५-१० सेंटिमीटर व्यासाची अंडाकार किंवा गोलाकार आणि रसभरित असतात. फळाच्या आतल्या सफेद गरात बदामासारख्या पिवळट १५-२० बिया असतात. तुवरक वृक्षाला ऑगस्ट ते मार्च या काळात फुले व फळे असतात.

बियांपासून सु. ४४% मेदी (चरबीयुक्त) तेल (कवटेल, खैटेल) मिळते ते पिवळे पण स्वादहीन व बेचव असून त्यामध्ये हिद्नोकार्पिक अम्ल (४८.७%), चौलमुग्रिक अम्ल (२७%) ओलेइक अम्ल (६.५%) इ. घटक असतात. रासायनिक संघटन व भौतिक गुणधर्म चौलमुग्रा तेलासारखे असतात. ते दिव्यात जाळण्याकरिता व औषधाकरिता फार उपयुक्त असते. त्वचारोग व महारोगावर अत्यंत गुणकारी. फळ श्रीलंकेत माशांना गुंगविण्यासाठी वापरतात. लाकूड पांढरे व बऱ्यापैकी असून तुळया, वासे इत्यादींकरिता वापरतात.[]

चौल मोगरा तेल गायनोकार्डीया ओडोरॅटा व हिद्नोकार्पस कुर्झी या दोन जातींपासून काढतात पण त्याचे गुणधर्म कमी प्रतीचे असतात.

याचे तेल हे एक आयुर्वेदिक औषध आहे.

अन्य भा़षांतील नावे

[संपादन]
  • बंगाली - चौलमुगरा (Chaulmugra)
  • इंग्रजी - मरोठी ट्री (Morothi Tree), चालमोगरा (Chalmoogra)
  • कन्नड - गरुडफल (Garudphal), सुंती (Suranti)
  • गुजराती - गुंवाडीयो (Guvandiyo)
  • पर्शियन - विरमोगरा (Virmogara), Jungali almond (जंगली आलमन्ड)
  • मल्याळम - कोटी (Koti), मारा वेट्टी (Mara vetti)
  • नेपाळी- तुवरक (Tuvrak)
  • संस्कृत - गरुडफल, तुवरक, कटुकपित्थ, कुष्ठवैरी
  • तामिळ - मरावेट्टई (Maravettai), निरादि मुट्टु (Niradi muttu)
  • तेलुगू - आदि-बदामु (Adi-badamu)
  • हिंदी - चौल मोगरा (चाल मोगरा)
  • शास्त्रीय नाव - Hydnocarpus laurifolia (Dennst.) Sleummer

संदर्भ

[संपादन]