तिमोरचा समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तिमोरच्या समुद्राचा नकाशा

तिमोरचा समुद्र (बहासा इंडोनेशिया: लाउत तिमोर, पोर्तुगीझ: Mar de Timor) हा इंडोनेशियाजवळील एक उथळ समुद्र आहे. तिमोर समुद्राच्या उत्तरेस तिमोर बेट, पूर्वेस अराफुरा समुद्र, दक्षिणेस ऑस्ट्रेलिया तर पश्चिमेस हिंदी महासागर आहे. हा समुद्र सुमारे ६,१०,००० चौरस किमी (२,४०,००० चौ. मैल) इतक्या क्षेत्रफळावर पसरला आहे व त्याची सरासरी खोली ४०५ मीटर (१,३२९ फूट) तर कमाल खोली ३,२०० मीटर (१०,५०० फूट) इतकी आहे.