ताओ धर्म
Appearance
(ताओ मत या पानावरून पुनर्निर्देशित)
ताओ वाद किंवा ताओ मत (अलीकडील संज्ञा दाओवाद) ही ताओसोबत (किंवा दाओसोबत) सुसंवादाने राहण्यावर भर देणारी तत्त्वज्ञानाची आणि धर्माची परंपरा आहे. ताओ वा दाओ ह्या चिनी भाषेतील शब्दाचा अर्थ 'रस्ता', 'मार्ग' किंवा 'पथ' असा असून काही वेळा 'तत्त्व' किंवा 'सिद्धांत' अशा अर्थानेही तो वापरला जातो आणि ताओ मत सोडून इतर चिनी तत्त्वज्ञानांमध्येही तो आढळतो. ताओ मतात, ताओ अशा गोष्टीचा निर्देश करते जे अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींमागचे प्रचालक बल आणि स्रोतही आहे. अंतिमतः ताओ अव्याख्येय आहे : "व्यक्त केला जाऊ शकणारा ताओ हा शाश्वत ताओ नाही."