दाल्लो एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डाल्लो एअर लाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

दाल्लो एरलाइन्स सोमाली विमानकंपनी होती. या विमान कंपनीचे मुख्यालय संयुक्त अरब अमिरातीतील दुबईयेथील अल गरहूड, या दुबई एरपोर्ट फ्री झोनमध्ये तर वाहतूकतळ जिबूती-अम्बौली आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होता. ही कंपनी मध्यपूर्व आणि ईशान्य आफ्रिकेत विमानसेवा पुरवायची.[१] २०१५मध्ये या कंपनीचे जुबा एरवेझशी एकत्रीकरण होउन आफ्रिकन एरवेझ या कंपनीची स्थापना झाली.

इतिहास[संपादन]

सन १९९१ मध्ये मोहमद इब्राहिम यासीन आणि मोहम्मद इब्राहिम यासीन ओलाड यानी जिबूती येथे या कंपनीची स्थापना केली.[२] २० मार्च १९९१ रोजी एका शेस्ना विमानाने ही हवाई शेवा सुरू झाली. २००१ च्या जुलै महिन्यामध्ये कांही बोईंग आणि अन्य विमानांची भर पडली असली तरी कंपनी प्रामुख्याने सोव्हिएट रशियाच्या विमानांचा वापर करीत राहिली. त्यामुळे प्रारंभी जिबूती आणि पॅरिस दरम्यान व ओक्टोंबर २००२मध्ये जिबूती आणि लंडन दरम्यान थेट विमान सेवा चालू करणे शक्य झाले. दाल्लो विमान कंपनीलाही जिबूतीच्या लोकसत्ताक सरकारची मान्यता होती. ही विमानकंपनी, आफ्रिकेतील हॉर्न आणि दुबई जेद्दासह अरब द्वीपकल्पापर्यंत प्रवासी, माल वाहतूक, राजकीय, टपाल या सेवा देते. २००७ सालच्या मार्चमध्ये या कंपनीचे ११० कर्मचारी होते. या विमान कंपनीला नंतरच्या वर्षात कंपनीला “दुबई वर्ल्ड सबसिडियरी इसतिथमार वर्ल्ड एव्हिएशन” रूपाने नवीन भागधारक मिळाले. त्यामुळे या विमान कंपनीचे मालक आणि संस्थापक मोहम्मद हाजी अबदिलाही ‘अबुसिता’ आणि मोहम्मद इब्राहिम यासीन “ओलाड” हे बोर्ड मेंबर म्हणूनच राहिले.व्यवस्थाकीय संचालक असलेले टेरी फॉक्स हे डिसेंबर २००८ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नत झाले. जिबूती ते युरोप खंडातील पॅरिस CDG आणि लंडन (गॅटविक) या मुख्य मार्गांवर या विमान कंपनीने सन २००९ पर्यंत अखंडित सेवा दिली.

कंपनीने सर्व विमान उड्डाण सेवा २०१० सालच्या मार्चमध्ये थांबवल्या, पण पुढील वर्षात परत सुरू केल्या.[३]

फेब्रुवारी २०१५मध्ये दाल्लो एरलाइनन्स आणि जुबा एरवेझचे एकत्रीकरण होउन आफ्रिकन एरवेझ या कंपनीची स्थापना झाली..

विमान मार्ग आणि आगमन ठिकाण[संपादन]

ही विमान कंपनी जगातील ८ देशांत सेवा पुरविते. त्यांत इथियोपिया, सोमालिया, जिबूती, युनायटेड अरब एमिरेट्‌स, सौदी अरेबिया, युनायटेड किंग्डम, केन्या, फ्रान्स यांचा समावेश आहे. या देशांतील आदिस आबाबा, बोसासो, जिबूती ,दुबई, हरगेसा, जेद्दा, लंडन, मोगाडिशू, नैरोबी, पॅरिस या १० शहरांना ही कंपनी प्रवासी, टपाल व मालवाहतूक सेवा पुरविते. [४] मे २०१४अखेर या विमान कंपनीकडे एर बस A321-200, BAe146-200 व बोइंग 737-300 ही विमाने आहेत.

ताफा[संपादन]

या कंपनीच्या ताफ्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. एक बोईंग ७३७-३०० विमानाच्या साहाय्याने विमानसेवा चालू आहे असे त्यांचे संकेतस्थळ दाखवीत आहे. तसेच एका मॅकडोनेल डग्लस डीसी-९-३० प्रकारचे विमानही सेवेत असल्याचे विमानतळावरील संकेतस्थळ दाखविते. सन १९९१ ते २००२ पर्यंत ही विमान कंपनी विविध विमाने चालवीत होती त्यात तुपोलेव तू-१५४, एएन-२४, इल्युशिन आयएल-१८, बोईंग ७६७ आणि लॉकहीड एल-४१० यांचा समावेश होता. ही विमान कंपनी बोईंग ७५७-२०० आणि ७२७-२००, इल्युशिन आयएल-७६ आणि एएन-१२ या विमानांच्या साहाय्याने मालवाहतूकसेवा पुरवते अशी माहिती इतर स्रोतांमार्फत मिळते.[५]

घटना आणि अपघात[संपादन]

२ नोव्हेंबर २०११ रोजी अन्तोनोव An-24 टेल क्र. Ey-47693 हे विमान बोसासो येथून जिबूतीकडे जाताना हायजॅक झाले. तेव्हा एका राष्ट्रभक्त असणाऱ्या प्रवासी सैनिकाने दोन अपहरणकत्यांचा सामना केला, तेव्हा दोघांनी त्यांच्या जवळील हत्यार काढले आणि वैमानिकाला विमान परत बोसासोकडे वळविण्यास सांगितले. या घटनेत एकही प्रवाशी जखमी झाला नाही किंवा विमालालाही कांही धोका पोहचला नाही.

मोगादिशू विमानतळावर ३० डिसेंबर २००९ रोजी दाल्लो एर लाइनच्या अन्तोनोव An-24 या विमानात एक प्रवासी चूर्णस्वरूपातील रसायन, एक द्रवपदार्थ आणि एक सिरिंज घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करीत होता. याच महिन्यात नॉर्थवेस्ट विमान कंपनीचे उड्डाण क्रमांक २५३ मध्येही अशीच घटना घडली होती. संबंधित व्यक्तीला पकडून सोमाली पोलीस कोठडीत पाठवले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "डिरेक्टरी-वर्ल्ड एरलाईन" (इंग्लिश भाषेत). ०६-१०-१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "डाल्लो एरलाईन टाइमलाईन" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2016-02-16. ०६-१०-१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "एर डाल्लो विमा्नाची माहिती" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2016-03-04. ०६-१०-१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "डाल्लो एरलाईन डेस्टिनेशन" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2016-01-28. ०६-१०-१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "दाल्लो एरलाइन फ्लीट" (इंग्लिश भाषेत). ०६-१०-१५ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे[संपादन]