डहाणूचा चिकू
Appearance
(डहाणूचा चिक्कू या पानावरून पुनर्निर्देशित)
डहाणूचा चिकू हे भौगोलिक मानांकन घोलवड डहाणू बोर्डी परिसरात होणाऱ्या चिकू फळाला इसवी सन २०१६ मध्ये मिळाले आहे. चिकू हे मुळचे मेक्सिको देशातील आहे. इसवी सन १८९६ मध्ये सर दिनशा मानेकजी पेटिट ह्यांनी त्यांच्या बागेत चिकूचे झाड लावले. इसवी सन १९०१ मध्ये अर्देशिर इराणी ने घोलवड गावात चिकूच्या बिया लावल्या.बोर्डी घोलवड येथील जमीन कँल्शियम गुणधर्म आहे. येथील हवामान उष्ण व दमट आहे. जमीन व हवामान चिकू झाडांना फारच पोषक आहे.त्यामुळे चिकू फळ अत्यंत स्वादपूर्ण, सुगंधी आणि पौष्टिक गुणांनी युक्त असे झाडावर निर्माण होते. चिकूला भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे येथील चिकू रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्याप्रमाणे जगप्रसिद्ध झाले.[१]
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, शनिवार दिनांक २३ मार्च २०२४