Jump to content

तंत्रज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टेक्नॉलॉजी या पानावरून पुनर्निर्देशित)
इ.स.च्या २०व्या शतकापर्यंत पृथ्वीचे वातावरण ओलांडून अंतराळात प्रवेशण्याइतपत मानवी तंत्रज्ञानाने झेप घेतली

तंत्रज्ञान (इंग्लिश: Technology, टेक्नॉलजी) म्हणजे अवजारे, यंत्रे, त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांचे संकल्पन, निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा होय. प्रागैतिहासिक काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहेत. अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने आग चेतवण्याचे तंत्र मानवांनी शोधून काढले. त्यानंतर चाकाचा शोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान लाभले. तेथून पुढे अगदी आधुनिक काळात छपाईचे तंत्रज्ञान, टेलिफोन, इंटरनेट या तंत्रांपर्यंत मानवाने तंत्रज्ञान विकसवले आहे. तंत्रज्ञान विकसनामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे.