Jump to content

दूरचित्रवाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टीव्ही या पानावरून पुनर्निर्देशित)

दूरचित्रवाणीचा शोध जॉन लोगी बेअर्ड या स्कॉटिश संशोधकाने लावला.

दूरचित्रवाणीचा इतिहास-

[संपादन]

ध्वनी आणि चित्रे एकाच वेळी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याच्या महात्वाकान्क्षेपोटी दूरचित्रवाणीचा जन्म झाला.प्रायोगिक स्वरूपात दुराचीत्रवाणीवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये दुराचीत्रावानिवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये अमेरिकेत झाले.१९३० च्या सुमारास न्युयार्कमध्ये यन.बी.सी. हे केंद्र तर लंडनमध्ये बी.बी.सी. हे केंद्र सुरू झाले.या केंद्रामधून नियमितपणे कार्यक्रम प्रक्षेपित होऊ लागले.

भारतात १५ सप्टेंबर,१९५९ रोजी प्रथम फिलिप्स इंडिया या कंपनीने सरकारला एक प्रक्षेपक बनवून दिला.युनेस्कोने केलेली मदत आणि सरकारने सामाजशिक्षणाचे डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय यातून केंद्राचे काम सुरू झाले.सुरुवातीला शैक्षणिक आणि समाज शिक्षण या उद्दिष्टाना समोर ठेवून सुरू झालेल्या या केंद्राने १९६५ मध्ये मनोरंजनपर कार्यक्रम प्रक्षेपित केले.१९७२ मध्ये मुंबई व त्यानंतर श्रीनगर,अमृतसर,कलकत्ता,लखनौ या ठिकाणी केंद्राची उभारणी झाली.१ एप्रिल,१९७६,मध्ये भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी या दोन्ही माध्यमांचे स्वतंत्र विभाग करण्यात आले.त्यावेळी दूरदर्शन हे नाव या माध्यमाला मिळाले.माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत हे मध्यम स्वतंत्रपणे कार्य करू लागले.