टाइम्स स्क्वेअर
Appearance
(टाइम्स स्क्वेर या पानावरून पुनर्निर्देशित)
टाइम्स स्क्वेअर हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील मध्यवर्ती भाग आहे. मिडटाउन मॅनहॅटनमध्ये असलेला हा चौक पर्यटन, व्यवसाय आणि मनोरंजनाचे मोठे केन्द्र आहे. टाइम्स स्क्वेअरचा केन्द्रबिंदू ब्रॉडवे आणि सेव्हेन्थ ॲव्हेन्यू असला तरी फॉर्टी सेकंड ते फॉर्टी सेव्हेन्थ स्ट्रीट पर्यंतचा भाग यात समाविष्ट होतो. ब्रॉडवे मनोरंजन प्रभाग येथून जवळ आहे.
टाइम्स स्क्वेअरमधून रोज सुमारे ३,३०,००० लोक ये-जा करतात. यातील बव्हंश पर्यटक असतात. गर्दीच्या दिवशी ४,६०,००० पर्यंत लोक येथे येतात. वर्षाकाठी ५ कोटी लोक या चौकास भेट देतात.