Jump to content

जे.पी. वासवानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जे.पी.वासवानी या पानावरून पुनर्निर्देशित)

जन्म :(२ऑगस्ट१९१८)(मृत्यू-१२जुलै२०१८)

फ़ोटो
जे.पी.वासवानी

जे.पी.ऊर्फ जशन पेहलाजराय वासवानी यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव कृष्णादेवी आणि वडिलांचे नाव पेहलाजराय होते. आध्यात्मिक गुरू साधू वासवानी हे जे.पींचे लहान बंधू होत. त्यामुळे जे.पींना दादा म्हणत.[ संदर्भ हवा ]

दादा वासवानी यांचे प्राथमिक शिक्षण हैद्राबाद (पाकिस्तान) येथे टी सी प्रायमरी स्कूल मध्ये झाले. ते एम.एस्‌सी(फिजिकस) व नंतर [[एल.एल‌बी झाले. १९४८ साली ते साधू वासवानींसह भारतात आले,१६ मार्च १९४८ त्यांनी पुण्यात साधू वासवानी आश्रमाची स्थापना केली. २५ नोव्हेंबर १९८६रोजी त्यांनी 'मीटलेस डे' सुरू केला. शिकागो येथील जागतिक धर्म संसदेत आणि न्यू यॉर्क येथील जागतिक शांतता परिषदेत त्यांची भाषणे झाली होती.[ संदर्भ हवा ]

लेखन

[संपादन]

इंग्रजीमध्ये ६८, हिंदीत१९, सिंधीत ५, मराठीमध्ये ७,कन्नडमध्ये ५, तेलुगू ३, अरेबियन २, चायनीज १, डच १, बहासा ४, स्पॅनिश१२, गुजरातीमध्ये १, ओरिया ५, रशियन १, तमिळ ९ अशी त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत.[ संदर्भ हवा ]