जीएसएम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा.


जीएसएम[संपादन]

GSM

जीएसएम (Global System for Mobile Communication किंवा GSM) मूळ (Groupe Spécial Mobile) : मोबाइल तंत्रज्ञानातील GSM ही सर्वात प्रसिद्ध असलेल्या दोन पद्धतींतली एक पद्धत आहे. मोबाइल तंत्रज्ञानात जागतिक पातळीवर जवळ जवळ ८०% हिस्सा या तंत्रज्ञानाचा आहे. ही पद्धत मुळात युरोपात सुरू झाली. सध्या जगातील २१२ देश या तंत्राचा वापर करतात. या तंत्रज्ञानामुळे कुठलाही जीएसएम वापरकर्ता कुठल्याही देशात रोमिंग करू शकतो. हे तंत्रज्ञान पूर्णपणे अंकीय संदेशवहन पद्धतीवर आधारित आहे. SMS या सेवेचे श्रेय जीएसएम या तंत्रज्ञानालाच जाते.

संक्षिप्त इतिहास[संपादन]

युरोपातील CEPT या संस्थेने १९८२ साली 'Groupe Spécial Mobile' या संकल्पनेची निर्मिती केली. पुढे १९८७ साली तेरा युरोपीय देशांनी एका कराराद्वारे ही पद्धती स्वीकारली आणि त्याच्या विकासाची जबाबदारी ETSI या संस्थेकडे सोपवली. या मानकाचा पहिला मसुदा १९९० साली तयार झाला. याच मसुद्याप्रमाणे १९९१ साली पहिले जीएसएम नेटवर्क फिनलंड या देशात नोकिया आणि सिमेन्स या दोन कंपन्यांनी विकसित केले.cdhegfgdkwfwdfskjdfsdfskjfsdf

तांत्रिक संकल्पना[संपादन]

GSM हे एक सेल्युलर पद्धतीवर आधारित तंत्रज्ञान आहे. या तंत्रात मोबाइल फोन सर्वात जवळच्या मोबाइल नियंत्रकाकडे राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो पर्यायाने प्रत्येक वेळी सर्वांच्या संपर्कात राहू शकतो. या बाबी प्रत्यक्षात येण्यासाठी विद्युत्‌-चुंबकीय लहरींचा सुयोग्य वापर केला जातो. GSM तंत्रज्ञान हे पूर्णपणे TDMA म्हणजेच काल विभाजन पद्धतीवर अवलंबून आहे. ह्या तंत्राची संरचना बाजूला दर्शविल्याप्रमाणे आहे. अशाप्रकारे GSM तंत्रज्ञानात खाली दिल्याप्रमाणे मुख्य भाग पडतात.

GSM संरचना
  • मोबाइल स्टेशन (मोबाइल वापरकर्त्याचा फोन)
  • बेस स्टेशन सबसिस्टिम
  • नेटवर्क स्विचिंग सबसिस्टिम