Jump to content

जादवपूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जादवपूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

जादवपूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता महानगराच्या दक्षिण क्षेत्रामधील जादवपूर परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ दक्षिण २४ परगणा जिल्ह्यामध्ये आहेत. जादवपूर हा तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांपैकी एक समजला जातो. तृणमूलचे उमेदवार येथून आजवर सहा वेळा निवडून आले आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. २२ - जादवपूरमध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ बारुईपूर पूर्व दक्षिण २४ परगणा
२ बारुईपूर पश्चिम
३ सोनारपूर दक्षिण
४ भानगड
५ जादवपूर
६ सोनारपूर उत्तर
७ टॉलीगंज

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
२०१४ सुगाता बोस तृणमूल काँग्रेस
२०१९ मिमी चक्रवर्ती
२०२४ सायोनी घोष

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]