जर्मन संग्रहालय (म्युन्शेन)
Appearance
(जर्मन संग्रहालय या पानावरून पुनर्निर्देशित)
जर्मन संग्रहालय जर्मनीच्या म्युन्शेन (म्युनिक/म्यूनिच) शहरातील एक प्रमुख आकर्षण आहे. या संग्रहालयात जर्मनीने विविध क्षेत्रात केलेल्या तांत्रिक प्रगतीचे प्रदर्शन आहे. येथे विविध तांत्रिक क्षेत्रांची दालने आहेत. उदा० खाणकाम. या दालनात प्रागैतिहासिक काळातील खाणकामातील तंत्रे, खाणींतील परिस्थिती, खाणीत वापरली जाणारी औजारे यांपासून ते आजच्या काळातील खाणकामातील तंत्रे, औजारे इत्यादी गोष्टींचे प्रदर्शन आहे. इतर दालनांत नौकाबांधकाम, पूल बांधणी, मशिने, इत्यादींचा समावेश होतो.