चर्चा:आशिया
'आशिया' नावाने हे पान स्थानांतरित करायला हवे
[संपादन]हे पान 'आशिया' या मराठीतील नावाने स्थलांतरित करायला हवे असे मला वाटते; कारण त्या-त्या भाषेत एखाद्या जागेला जी नावे रूढ झाली असतात तीच वापरायला हवीत. उदा. जर्मन विकिपीडियावर आशियाकरता जर्मन भाषेत असलेल्या 'Asien' या नावानेच लेख आहे. त्यामुळे मराठीतही हा लेख आपल्या भाषेतील नावाने असावा असे वाटते.
--संकल्प द्रविड 04:36, 4 नोव्हेंबर 2006 (UTC)
अरेच्चा!!
[संपादन]- वरील मुद्द्याबद्दल अजून कोणाचीच मते वाचायला मिळाली नाहीत! विकिकरहो, कृपया या मुद्द्याबद्दल मत व्यक्त करा.
- -संकल्प द्रविड 06:54, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
बरोबर
[संपादन]एशियाऐवजी "आशिया" असा बदल करायला हवा. Ajitoke 07:56, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
फक्त आशिया कडे Redirect करावा. हिंदी भाषा विकीत मुंबईला बंबई म्हटलेले मला आवडणार नाहे त्याचप्रमाणे एशिया हेच मुख्य पान ठेवावे.महाराष्ट्र एक्सप्रेस 11:54, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
Re:बरोबर
[संपादन]"फक्त आशिया कडे Redirect करावा. हिंदी विकीत मुंबईला बंबई म्हटलेले मला आवडणार नाहे त्याचप्रमाणे एशिया हेच मुख्य पान ठेवावे"
हा दाखला मला पटला नाही. एशिया हा उच्चार(नाव नव्हे) इंग्लिश भाषेत आहे; पण मुळात 'Asia' ला 'एशिया' हे नाव इंग्रजांनी ठेवले नाही. ते ग्रीक/रोमन लोकांच्या इतिहासात वापरले गेले आहे आणि त्याचे रोमन स्पेलिंग Asia असले तरी खुद्द युरोपात वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचा उच्चार वेगळा होतो (आणि जर्मन सारख्या इंग्लिश भाषेच्या नात्याने 'थोरल्या' असलेल्या भाषेतदेखील 'Asien' असे स्पेलिंग केले जाते.. उच्चार 'आजियन्' असा होतो). थोडक्यात, 'एशिया' या उच्चाराला प्रमाण मानावे हा आग्रह साधार वाटत नाही.
पण मुंबईच्या उदाहरणात मुंबईचे नाव मुळातच मराठी आहे आणि केंद्र सरकारनेदेखील सरकारी हिंदीत त्याचे लेखन 'मुंबई' असेच करावयाचे ठरवेले आहे; त्यामुळे या मुद्द्यावर एकमत आहे.
दुसरी गोष्ट अशी की 'आशिया' हे विशेषनामदेखील आपल्याकडे गेले काही दशके (कदाचित शतके) रूढ आहे; त्यामुळे त्याला मुख्य पान ठेवावे असेच माझे मत अजूनही आहे.
--संकल्प द्रविड 12:15, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
- मला आपला खुलासा पटला. कृपया आशिया हे नाव रुढ करावे.महाराष्ट्र एक्सप्रेस 12:36, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)
- "आशिया" ला अनुमोदन. संकल्प यांचा खुलासा छानच आहे. पाटीलकेदार 12:48, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)