Jump to content

हैयान चक्रीवादळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चक्रीवादळ हैयान या पानावरून पुनर्निर्देशित)

चक्रीवादळ हैयान (इंग्लिश: Super Typhoon Haiyan, सुपर टायफून हैयान; फिलिपाइन्समध्ये टायफून योलांडा) हे प्रशांत महासागरातील इ.स. २०१३ साली तयार झालेले एक चक्रीवादळ आहे. हे २०१३ मोसमातील १३वे नामांकित चक्रीवादळ असून आत्तापर्यंत झालेल्या सगळ्यां प्रचंड चक्रीवादळांतील एक आहे.

हे वादळ कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरूपात नोव्हेंबर २, इ.स. २०१३च्या सुमारास पोहनपैजवळ तयार झाले. तेथून पश्चिमेकडे सरकत हे वादळ नोव्हेंबर ९ रोजी फिलिपाइन्सवर धडकले. तोपर्यंत त्याला सुपर टायफूनचा दर्जा दिला गेलेला होता. फिलिपाइन्सच्या घीवान शहराजवळ जमिनीवर येताना या वादळात ताशी ३१५ किमी (१९५ मैल प्रतितास) वेगाचे वारे होते. शेकडो मृत्यूंना कारणीभूत ठरल्यावर हे वादळ फिलिपाइन्सच्या आरपार दक्षिण चीन समुद्रात घुसले आणि तेथून मकाऊ, व्हियेतनाम आणि चीनकडे सरकले.