ग्लिरीसीडीया (वृक्ष)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Gliri sepi 081226-4794 F ipb

ग्लिरीसिडीया जलद वाढणारा ठिसूळ वृक्ष असून शेतात,कुंपणाला लागून रस्त्याच्या दुतर्फा,भात-खाचरांच्या बांधावर,मोकळ्या जागेत लावण्यासाठी योग्य असतो.त्याच्या बिया खालल्यावर उंदीर मारतात,त्यामुळे त्यास उंदीरमार या नावाने संबोधतात.ग्लिरीसिडीयापासून सरपण मिळते.त्याचप्रमाणे जमिनीत फार मोठया प्रमाणात नाट्रोजन स्थिर होऊन नापीक जमिनी सुधारतात.

ग्लिरीसिडीया झुडपापासून वाढतो.योग्यरीतीने वाढ नियंत्रित केल्यास ३० ते ३५ फूट उंचीचा वृक्ष होऊ शकतो.खोडाचा घेर १ फुटापर्यंत होऊ शकतो.भारतात सर्वत्र या वृक्षाची वाढ होऊ शकते.हलक्या,मध्यम स्वरूपाच्या जमिनी तसेच चुनखडीयुक्त जमिनीत याची वाढ होते.महाराष्ट्रात त्याची सर्वत्र लागवड होऊ शकते.

ग्लिरीसीडियाची लागवड बियापासून रोपे तयार करून केली जाते.छाट कलमे लावून देखील लागवड होऊ शकते.साधारणत: गरम पाण्यात बी टाकून रात्रभर तसेच ठेऊन तसेच रोपण करतात.बियाणाची उगवण भरपूर प्रमाणात होते.चार-सहा महिन्यांची रोपे लागवडीसाठी योग्य असतात.