Jump to content

गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स (अन्य उच्चार गिनिज बुक...) हा विक्रीचा जागतिक उच्चांक नोंदविणारा एक संदर्भ ग्रंथ आहे.

'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स' हे दरवर्षी प्रकाशित होणारे संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जगातील सर्व कीर्तिमान व्यक्तींच्या विश्वविक्रमांच्या सविस्तर माहितीचे संकलन केलेले असते. हे पुस्तक 'सर्वाधिक विक्री होणारे कॉपीराईट पुस्तक' म्हणून स्वतःच एक रेकॉर्डधारी पुस्तक आहे. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स' या पुस्तकामधील विश्वविक्रमांची माहिती तशीही सर्वच प्रसारमाध्यमांतर्फे तसेच संग्रहालयांतूनही दिली जाते. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌सची इ.स. २०१५ साली प्रकाशित झालेली आवृत्ती ही या पुस्तकाची एकसष्टावी आवृत्ती आहे.

इतिहास

[संपादन]

इंग्लंडमधील गिनेस ब्रुअरीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या सर ह्यूग कॅम्पवेल बीव्हर यांना ते शिकार करीत असलेल्या सुवर्ण प्लोव्हर आणि लाल ग्राऊस या पक्ष्यांपैकी अधिक चपळ कोण असा विचार मनात आला. मित्रमंडळीत चर्चा करूनही त्यांना या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळाले नाही. घरी येऊन्बीव्हर यांनी अनेक पुस्तके धुंडाळली, पण तरीही त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. अखेर १९५४ सालीबीव्हर यांना ही माहिती एका पुस्तकात सापडली.पण ही माहिती अधिकृत असेल याबद्दल बीव्हर यांना शंका होती. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या कंपनीचे कर्मचारी ख्रिस्तोफर यांना बोलून दाखवली. ख्रिस्तोफर यांनी बीव्हर यांची गाठ नॉरिस आणि रॉस मॅक्विटर या तरुणांशी घालून दिली. हे दोघे तरुण, लंडनमध्ये एक सत्यशोधक मंडळ चालवत होते. या तिघांच्या प्रयत्‍नांतून गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌सची निर्मिती झाली. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५५मध्ये प्रसिद्ध झाली.

गिनेस बुकमध्ये प्रसिद्ध होण्यापूर्वी संबंधित माहितीच्या सत्यतेची तावून सुलाखून खात्री करून घेतली जाते; त्यामुळे गिनेस बुक हा माहितीचा विश्वसनीय स्रोत समजला जातो.