खार (मुंबई)
खार ही मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एक परिसर आहे. मूळ मुंबईच्या बेटांवरील खार दांडा हे गाव येथे आहे.[१]
खार परिसर
[संपादन]इसवी सन १८९६मध्ये मुख्य मुंबई (दक्षिण मुंबई - वांद्रे ते चर्चगेट) येथे प्लेग ची साथ आली. त्या साथीमध्ये अनेक लोकांना लागण होऊन बरीच माणसे दगावली. त्यावेळी मुख्य मुंबई सोडून बरेच लोक मुंबई उपनगरात राहावयास गेले. दक्षिण मुंबई येथील मूळ स्थानिक असलेले पाठारे प्रभू समाजातील काही लोकही स्वच्छ हवा, साफ पाणी,आणि निरोगी जागा उपलब्ध असलेल्या खार येथे गेले व तेथेच कायमस्वरूपी राहावयास लागले. येथेच पाठारे प्रभू नगर स्थापन करून ते कायमचे स्थिरस्थावर झाले. येथे आलेल्या अनेक पाठारे प्रभू समाजातील लोकांपैकी एक कुटुंब चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे होते. त्यांचा अंबा सदन हा बंगला होता. या बंगल्याजवळून जाणाऱ्या रस्त्याला बृहन्मुंबई महानगरपालिकेने चित्रकार धुरंधर मार्ग हे नाव दिलेले आहे.[२]
हे सुद्धा पहा
[संपादन]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Khar Danda | KharWest.com - Khar West Local News". 2013-11-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-04-27 रोजी पाहिले.
- ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, मंगळवार,९ जुलै २०२४.लेखन -संदीप दहिसरकर-पुरातत्व शास्त्र व कला इतिहास तज्ञ.