खापरखेडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खापरखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील एक गांव आहे.

खापरखेडा
जिल्हा नागपूर
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक 07113


हे गांवास जाण्यासाठी नागपूर-सावनेर-ओबेदुल्लागंज या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६९ वरील दहेगांव या गावापासुन कामठी रस्त्याने जावे लागते.या गावाजवळच वलनी येथे कोळश्याच्या खाणी आहेत. नागपूर या शहरापासुन सुमारे १४ कि.मि. अंतरावर आहे.येथे औष्णीक [१]विद्युत केंद्र आहे.कन्हान व कोलार या नद्या या गावाचे आजुबाजुने वाहतात. पुढे कामठीकडे जातांना बीना या गावांजवळ या नद्यांचा संगम आहे. फार पुर्वी,येथे ३० मेगा वॅट क्षमतेचे इंग्रजकालीन औष्णीक विद्युत केंद्र होते.

संदर्भ[संपादन]

  1. http://www.mahagenco.in/INSTALLED-CAPACITY-01.shtm

बाह्य दुवे[संपादन]

mahagenco.in