कॉनराड कॉरफील्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॉनरेड कॉरफिल्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

सर कॉनरेड कॉरफिल्ड (इंग्लिश Conrad Corfield) (इ.स. १८९३ - इ.स. १९८०) हे एक ब्रिटीश भारतीय अधिकारी होते. ते लॉर्ड माउंटबॅटन यांचे राजकीय सल्लागार होते.

सर कॉरफिल्ड हे भारतातील संस्थानांविषयीच्या सरकारी विभागाचे प्रमुख होते. भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतातील संस्थानांना स्वतंत्र राहण्याची परवानगी मिळावी असे त्यांचे मत होते, परंतु लॉर्ड माउंटबॅटन यांनी या मतास पाठिंबा दिला नाही.

त्यांच्या भारतातील अनुभवांच्या आधारे त्यांनी द प्रिंसली इंडिया आय क्न्यू हा ग्रंथ लिहिला.

संदर्भ[संपादन]

  • लॅरी कॉलिन्स. फ्रिडम ॲट मिडनाईट (इंग्रजी भाषेत). १९ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.