केशभूषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: प्रताधिकार भंग http://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/91593293e/91594793692d94293793e

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.


आकर्षक केशरचना. स्त्रीपुरूष या दोहोंनाही केशभूषेचे आकर्षण असते. केस कापणे, धुणे, नीट करणे, विंचरणे, कुरळे करणे व विविध उपायांनी केसांचे सौदर्य वाढविणे यांसारख्या गोष्टी केशभूषेत अंतर्भूत होतात.आकर्षकता किंवा सौंदर्य वाढविणे हा जरी केशभूषेचा प्रमुख उद्देश असला, तरी सामाजिक संकेतांनुसार खाजगी व सार्वजनिक समारंभ, धार्मिक विधी व उत्सव त्याचप्रमाणे इतरही प्रकारची प्रतीकात्मता यांसाठी केशभूषेच्या विविध शैली रूढ झालेल्या आढळतात. आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपला पराक्रम व गुणवैशिष्ट्य दाखविण्याकरिता त्यात विजयचिन्हे आणि पदके लावीत. केशभूषेचा उगम यातूनच झाला असावा. तसेच केस इतरांना दिसू न देण्याचा पुरातन स्त्रीच्या प्रयत्नातून केशबंधाची कल्पना पुढे आली असावी.

जुन्या काळातील केशभूषाही पारंपरिक कल्पनांवर आधारित असे. पिसांचे गुच्छ किंवा मुकुट केसात खोवण्याची वन्य लोकांची प्रथा, चिनी लोकांची शेंडीची वेणी घालण्याची पद्धती, धर्ममार्तंडांची मुंडनपद्धती हीपारंपरिक केशभूषेची काही उदाहरणे आहेत. केस स्वच्छ करणे, रंगविणे, सुगंधित करणे, कमी करणे, कापणे, वेणी घालणे, गंगावनासारख्या कृत्रिम केसांचा वापर करणे, केसांचा टोप घालणे, जाळी किंवा झिरझिरीत कापडाने केस झाकणे, त्याचप्रमाणे हिरे, मोती, पिना, पीस, रंगीबेरंगी फीत, कृत्रिम किंवा नैसर्गिक फुले इत्यादींनी केसांची सजावट करणे, यांसारखे प्रकार फार पुरातन काळापासून रूढ असल्याचे दिसते. असे असले तरी केशभूषेच्या शैलीत मात्र कालमानाप्रमाणे व बदलत्या सौंदर्यद्दष्टीप्रमाणे सतत बदल होत गेला आहे. विविध देशांतील जातीजमातींतील केशभूषेचा आढावा घेतला, तर हीच गोष्ट दिसून येते.

ऐतिहासिक आढावा: केशसंवर्धन, केशवपन आणि केशभूषा यांविषयी जगातील निरनिराळ्या देशांत विविध प्रथा आढळून येतात. पुरुषांनी केस कापणे, स्त्रियांनी ते वाढविणे, असेच सामान्यतः आढळून येते. केसांना तेले, प्रसाधने लावून व त्यांची विविध वळणे, वलये साधून ते शोभायमान व आकर्षक बनविण्याची विविध तंत्रे सर्वत्र थोड्याफार फरकांनी सारखीच आढळतात भारतात प्राचीन काळी स्त्रिया व पुरुष केस वाढवून अनेक प्रकारच्या केशरचना आकर्षक पद्धतीने करीत. त्या काळात पुरुषही स्त्रियांप्रमाणे आपल्या केसांची वेणी घालीत. अशा केसांच्या वेणी बांधण्याच्या प्रकाराला कैदर्प म्हणत. प्रत्येक कुळातील लोक आपापल्या कुल-पद्धतीप्रमाणे केशरचना करीत. तत्कालीन स्त्रिया या आकर्षक केशरचनेत कुशल होत्या.


रामायणकाळात केसांचे उत्तम संगोपन व वाढ करून मनोहर केशरचना करीत. ती फुलांनी वा सुगंधांनी शृंगारण्यावर विशेष भर दिला जात असे. सुंदर, काळ्या व कुरळ्या केसांचे रामायणकाळात लोकांना आकर्षण वाटे. नितंबापर्यंत नागिणीप्रमाणे लोंबणारी वेणी हा स्त्रियांच्या केशरचनेचा आदर्श होता. या काळात पुरुष आपले केस वाढवून त्याची गाठ किंवा वलये करून डोक्यावर बांधीत. तपस्वी, ऋषिमुनी जटा बांधण्यासाठी विशिष्ट वृक्षांचा चीक वापरत असत.

स्त्रिया अनेक प्रकारच्या वेण्या घालीत व त्यावर रत्नमाला जडवीत. नितंबापर्यंत रुळणाऱ्या वेणीस प्रवेणी म्हणत. वेणीसाठी सोन्यात जडविलेला मोत्यांचागोंडाही त्या वापरत. फाशाप्रमाणे केलेल्या केशरचनेस केशपाश म्हणत. या केशपाशावर फुलांचा गजरा गुंडाळत. पुष्कळदा केस मुकुटासारखे डोक्यावर उभे बांधून ते पुष्पमालांनी किंवा रत्नमालांनी सजवीत. मऊ व काळ्याभोर केसांची प्रशंसा त्या काळाच्या वाङ्‍मयात आढळते. केस काळे, मऊ व सुगंधित होण्यासाठी विविध प्रसाधनांचा उपयोग केला जाई. प्राचीन कोरीव लेण्यांत प्राचीन भारतातील स्त्रियांच्या केशररचनेचे विविध प्रकार आढळतात. त्यांतही अजिंठा, वेरूळ, कोनारक, खजुराहो येथील शिल्पाकृतींत आढळणाऱ्या स्त्रीपुरुषांच्या केशरचना उल्लेखनीय आहेत. या प्राचीन केशरचनांचे अनुकरणही आधुनिक भारतीय स्त्रिया करताना आढळतात.

भरताने आपल्या नाट्यशास्त्रात नाटकातील निरनिराळ्या पात्रांनी करावयाच्या विविध केशरचनांची माहिती दिलेली आहे. ग्रीक लोकांत पुरुषांचे केस आखूड ठेवण्याची प्रथा होती. परंतु ते काळजीपूर्वक विंचरलेले किंवा कुरळे केलेले असत. स्त्रिया आपल्या केसांचा मधोमध भांग पाडून ते पाठीमागे घेऊन बांधीत. यासाठी डोक्याभोवती एक फीत बांधून बाजूचे केस त्यात गुंतवीत. स्त्रीपुरुषांत केस कुरळे करण्याची प्रथा होती, असे दिसते. ग्रीक साहित्यिक व विचारवंत मात्र लांब केस ठेवत व दाढीमिशाही राखत.