Jump to content

कुंदन शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुंदन शहा या पानावरून पुनर्निर्देशित)
कुंदन शाह

कुंदन शहा (१९ ऑक्टोबर, १९४७; ७ ऑक्टोबर, २०१७) हे एक हिंदी पटकथा लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांनी हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीमालिकांचे दिग्दर्शन केले

यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया येथे दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतले होते.

शाह यांच्या १९८३मधील जाने भी दो यारों या पहिला चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. १९९३मध्ये त्यांनी कभी हां कभी ना या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले.

दूरचित्रवाणी मालिका

[संपादन]

‘नुक्कड’ आणि ‘वागले की दुनिया’ या दोन मालिका भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात शहा यांच्या कुशल आणि अभिजात दिग्दर्शनाने अजरामर झाल्या. फुटपाथवरील आयुष्यावर बेतलेली ‘नुक्कड’ असो किंवा मध्यमवर्गीयांच्या काट्यावर चालणाऱ्या जीवनाचे चपखल चित्रण करणारी ‘वागले की दुनिया’ ही मालिका असो, या दोन्ही मालिका कसदार दिग्दर्शनाने विलक्षण लोकप्रिय ठरल्या. ‘ये जो है जिंदगी’ या खुसखुशीत हास्य मालिकेने निखळ हास्य विनोदाचा दर्शकांना आनंद दिला होता. मालिकेतील बहुतेक सर्व पात्रे ही मध्यमवर्गीय, सर्वसामान्य स्तरावरचीच टिपलेली आहेत. ‘नुक्कड’मधील रस्त्यावरची माणसे तर जवळपास वाया गेलेलीच होती, पण त्या पात्रांच्या माध्यमातून शहा यांनी सामान्य तरुण माणसांचे एक उत्तम अंतरंग, त्यातील चांगुलपणा प्रभावीपणे समोर आणला होता. ‘वागले की दुनिया’ ही मालिका प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या ‘कार्टून’वर आधारित होती. पडदा, मग तो छोटा असो की मोठा,शहा यांनी दिग्दर्शन क्षेत्रात भरीव योगदान दिले. हाती घेतले ते मनःपूर्वक पूर्ण केले आणि प्रेक्षकांना निखळ साहित्यकृतीचा आनंद मिळवून दिला.

दिग्दर्शन केलेले हिंदी चित्रपट आणि (दूरचित्रवाणी मालिका)

[संपादन]
  • एक से बढकर एक
  • कभी हां कभी ना
  • कया कहाना
  • जाने भी दो यारों
  • The Three Sisters
  • दिल ने कहा
  • दिल है तुम्हारा
  • नुक्कड (मालिका)
  • पी से पीएम तक
  • पेरसाई कहते हैं
  • वागले की दुनिया (मालिका)
  • हम तो मुहब्बत करेगा

कुंदन शहा यांची पटकथा असलेले चित्रपट/मालिका

[संपादन]
  • कभी हां कभी ना
  • खामोश
  • जाने भी दो यारों
  • दिल है तुम्हारा
  • पी से पीएम तक
  • हम तो मुहब्बत करेगा

चित्रपटांना मिळालेले पुरस्कार

[संपादन]
  • 'जाने भी दो यारों'च्या दिग्दर्शनाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार. लेखकाबद्दल आणि चित्रपट कलावंतांबद्दल देशात वाढत चाललेल्या असहिष्णुतेचा विरोध म्हणून कुंदन शहा यांनी हा पुरस्कार परत केला.(नोव्हेंबर २०१५).