कार्ल लँडस्टेनर
Appearance
(कार्ल लॅंडस्टायनर या पानावरून पुनर्निर्देशित)
कार्ल लॅंडस्टेनर (१४ जून, १८६८:ऑस्ट्रिया - २६ जून, १९४३:न्यू यॉर्क, अमेरिका) हे ऑस्ट्रियाचे एक जैववैज्ञानिक व चिकित्सक होते. सन १९०० मध्ये त्यांनी रक्ताच्या मुख्य गटांचे वर्गीकरण केले.
त्यांचा जन्म १४ जून १८६८ रोजी ऑस्ट्रिया या देशात झाला . त्यांनी वैद्यकशास्त्र , विषाणूशास्त्र या क्षेत्रांत कार्य केले . त्यांनी रक्तगटांचा शोध , Rh घटकाचा शोध आणि पोलिओ विषाणूचा शोध यांमुळे जगात प्रसिद्धी मिळवली . त्यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार १९३० साली मिळाला. त्यांचा मृत्यू २६ जून १९४३ साली वयाच्या ७५ व्या वर्षी न्यू यॉर्क , अमेरिका येथे झाला .