कटघोरा डोंगरगड रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कटघोरा डोंगरगड रेल्वे मार्ग हा भारतातील एक प्रस्तावित रेल्वेमार्ग आहे. या रेल्वेमार्गाचे अंतर सुमारे २९५ किमी आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५९५०.५४ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. या कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.हा रेल्वेमार्ग ५३ महिन्यात उभारण्याचे प्रस्तावित आहे.हा भागीदारीमधून साकारण्यात येणारा एक प्रकल्प आहे.त्यातील एक छत्तीसगढ रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक कंपनी आहे.महाजेनकोएसीबीआयएल ह्या दोन इतर कंपन्या आहेत.[१][२][३]

हा रेल्वेमार्ग कोरबा, बिलासपूर, मुंगेली, कवर्धाराजनांदगाव या जिल्ह्यामधून जाणार आहे. या मार्गावर २५ रेल्वे स्थानके उभारली जाणार आहेत.त्यातील प्रमुख ही कटघोरा,रतनपूर,कवर्धा,खैरागड ही आहेत.

संदर्भ[संपादन]