Jump to content

ऑलिंपिक एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑलिंपिक एरलाईन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑलिंपिक एरलाइन्स (ग्रीक भाषा: Ολυμπιακές Αερογραμμές, ऑलिंपियाकेस एरोग्रामेस) ह ग्रीसमधील विमानवाहतूक कंपनी होती. याला ऑलिंपिक एरवेझ असेही नाव होते. ही कंपनी ग्रीसची मुख्य कंपनी होती. या कंपनीचे मुख्यालय अथेन्स शहरात होते.[] कंपनीच्या ३७ देशांतर्गत आणि ३२ आंतरराष्ट्रीय सेवा आहेत.[] कंपनीचा मुख्य तळ अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ असून, थेसालोनिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, “मेसाडोनिया”, हेराकिलो आंतरराष्ट्रीय विमानतळ, “निकोस काझांतझाकिस” आणि रोड्स आंतरराष्ट्रीय विमानतळ, “डायगोरस” येथे हब्स आहेत. तसेच कंपनीचा लंडन येथील हिथ्रो विमानतळावर सुद्धा तळ आहे. डिसेंबर २००७ पर्यंत कंपनीचे ८,५०० कर्मचारी होते.[] ऑलिम्पिक एरलाइन्सला त्यांच्या सुरक्षेसंबंधातील व्यवस्थेसाठी आयएटीए कडून आयओएसए मानांकन मिळालेले आहे.[]

६ मार्च २००९ला ग्रीक राज्याने कंपनीचे हवाई कार्ये, तळावरील कार्ये तसेच तांत्रिक कार्ये मार्फिन इन्वेस्टमेंट ग्रुप (ग्रीसमधील सगळ्यात मोठी गुंतवणूक कंपनी)ला विकत असल्याची घोषणा केली, ज्याने राज्याची ३५ वर्षाची मालकी संपुष्टात आली.

२९ सप्टेंबर २००९ला ऑलिम्पिक एरलाइन्स ने त्यांचे जवळपास सगळी कार्ये आणि हवाई सेवा बंद केल्या. ऑलिम्पिक एर नावाची नवीन खाजगी कंपनी स्थापन्यात आली. त्यानंतरही काही काळ कंपनीची काही ग्रीक बेट तसेच युरोपिअन युनियनच्या बाहेर काही ठिकाणी सेवा सुरू होती जी नंतर एक सरकारी टेंडर काढून तिचे वाटप करण्यात आले. ३१ डिसेंबर २००९ला कंपनी संपूर्णपणे बंद करण्यात आली.

इतिहास

[संपादन]

ऑलिम्पिक एरलाईनची पूर्वज कंपनी इकारसची स्थापना १९३०मध्ये झाली होती. पण ग्रीक लोकांनी हवाई वाहतुकीस प्रतिसादना दिल्याने आणि आर्थिक परिस्थिती ढासळल्याने काही महिन्यातच कंपनी दिवाळखोरीत निघाली. काही काळाने १९३५मध्ये टीएइ नावाच्या एका दुसऱ्या खाजगी कंपनीची स्थापना करण्यात आली. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर १९४७मध्ये ग्रीसमध्ये ३ विमानकंपन्या होत्या.

१९५१मध्ये तिन्ही कंपन्यांची आर्थिक परिस्थिती बघता ग्रीक राज्याने त्यांचे विलीनीकरण करून ‘टीएइ ग्रीक राष्ट्रीय विमानकंपनी’ ही एकच कंपनी स्थापण्याचा निर्णय घेतला. ह्या नवीन कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याने १९५५मध्ये ती बंद करण्यात आली. कुणीही खरेदीदार न मिळाल्याने राज्याने परत टी कंपनी विकत घेतली.

जुलै १९५६मध्ये ग्रीक राज्य आणि ऍरिस्टोटल ओनासिस या शिपिंग कंपनी सोबत, ओनासिस ही विमानकंपनी खरेदी करण्यासोबतचा करार करण्यात आला. ६ एप्रिल १९५७मध्ये कंपनीचे नाव बदलून ऑलिम्पिक एरवेझ करण्यात आले.[] नवीन कंपनी वेगाने विकसित होऊ लागली. ग्रीक लोकांमध्ये हवाईप्रवासाचे महत्त्व वाढवण्यासाठी कंपनीने ‘१९५७ मधील हवाईवाहतुकीचे दिवस’ या योजनेअंतर्गत डीसी-३ विमानाने जवळच्या शहरांसाठी मोफत प्रवास सेवा देऊ केली. ओनासिसला नेहमी आधुनिक तंत्रज्ञान वापरात अग्रेसर राहायचे होते. त्यामुळे त्यांनी १९६० मध्ये त्यांचे पहिले जेट विमान विकत घेतले. ऑलिम्पिक आणि ब्रिटिश युरोपियन एरवेझने आधी एक कोडशेअर सेवा सुरू केली. पुढे त्यांनी या सहकार्यात वाढ केली.

१९६५ मध्ये ऑलिम्पिकने बोईंग ७०७-३२० जेट विमानांची ऑर्डर दिली. १९६८मध्ये ऑलिम्पिक ने आफ्रिकेमध्ये सेवा देण्यास सुरुवात केली. आठवड्यातून २ वेळा ही सेवा होती ज्यामुळे अथेन्स शहर नैरोबी आणि जोहान्सबर्ग या शहरांशी जोडले गेले.

२२ जानेवारी १९७३मध्ये अचानक एक अशी घटना घडली ज्यामुळे ऑलिम्पिक एरलाइन्सचे भवितव्य बदलले. ऍरिस्टोटल ओनासिस यांचा मुलगा अलेक्साण्डर याच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूने अवघा ग्रीक देश हादरला आणि ऑलिम्पिक एरवेझचे एक नवे पर्व सुरू झाले. काही महिन्यातच ओनासिस ने त्यांचे सगळे शेअर्स ग्रीक राज्याला विकले. व्यवस्थापन त्रुटींमुळे १९८०मध्ये कंपनी गंभीर आर्थिक संकटात सापडली. ग्रीक नेते आणि त्यांचे नातेवाईक मोफत विमानप्रवास करू लागले, ज्यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान होत होते.

ऑलिम्पिक एरलाईन्स ते ऑलिम्पिक एर

[संपादन]

६ मार्च २००९ ला, विकसन मंत्री कोस्तीस हात्झीदाकीस यांनी हवाई कार्ये तसेच तांत्रिक कार्ये मार्फिन इन्वेस्टमेंट ग्रुपला विकत असल्याची घोषणा केली. ज्यामुळे तब्बल ३५ वर्ष सरकारी नियंत्रणात आणि १० वर्ष विक्रीच्या खटाटोपानंतर सरतेशेवटी कंपनी पुन्हा खाजगी नियंत्रणात आली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Olympic Airways - Contact Us". 2002-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-07-23 रोजी पाहिले.
  2. ^ "Olympic Airlines flights". 2016-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-07-23 रोजी पाहिले.
  3. ^ "Olympic 'facing difficult future'".
  4. ^ "Olympic Airlines IOSA Operators Profile". 2007-11-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-07-23 रोजी पाहिले.
  5. ^ "Olympic Air Profile".
  6. ^ "Olympic Air to become subsidiary of Aegean Airlines in €72m deal".