Jump to content

मूकनायक समलिंगी उभयलिंगी तृतीयपंथी द्विलिंगी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एलजीबीटीआय मराठी साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)

समलिंगी उभयलिंगी तृतीयपंथी द्विलिंगी (एलजीबीटीआय) समाजातील अनेकांनी आपले विचार साहित्यामधून व्यक्त केलेले आहेत, परंतु लैंगिकतेविषयी मराठीत नाटके, कविता, संशोधने व इतर साहित्याच्या निर्मात्यांना एकत्र व्यासपीठ मिळत नव्हते.[] पुण्यामधील समपथिक ट्रस्ट दीड तपाहूनही जास्त काळ पुरुष समलिंगींच्या आरोग्याच्या मुद्द्यांवर काम करते.[] या संस्थेने पुणे शहरात २५ नोव्हेंबर २०१८ रोजी १ले एलजीबीटीआय मराठी साहित्य संमेलन भरवले होते.[] हे संमेलन २०१८ पासून दरवर्षी भरवले जाईल अशी घोषणा समपथीक ट्रस्टचे संस्थापक संचालक बिंदुमाधव खिरे यांनी केली.[]

मूकनायक २०१८

[संपादन]

२५ नोव्हेंबर २०१८ रोजी जोस्ना भोळे सभागृह, पुणे, येथे भरलेल्या या साहित्य संमेलनाला महाराष्टभरातून जवळपास १०० लोक सामील झाले होते.[] ह्या संमेलनात बिंदुमाधव खिरे, जमीर बदरुन्निसा, वैशाली रोडे यांनी आपल्या साहित्यातील भाग वाचले. सारंग पुणेकर, दिशा शेख यांनी आपल्या कविता सादर केल्या. मनीषा गुप्ते यांनी पुरुषी स्त्रिया, बायकी पुरुष आणि हिजडे यांच्यावर होणाऱ्या हिंसेबद्दल मांडणी केली. सुरेश खोले आणि पुष्कर एकबोटे यांनी मराठी विकिपीडियावर लिंगभाव आणि लैंगिकता यां विषयांवर कसे योगदान देता येईल याविषयी माहिती दिली.[] विश्वास सहस्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले.[][]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "'त्यां'ची वेदना उमटणार त्यांच्याच साहित्यामधून, पुण्यात होणार राज्यातील पहिले 'एलजीबीटीआय' साहित्य संमेलन". Lokmat. 2018-07-13. 2018-11-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Who We Are | Samapathik". samapathik.org (इंग्रजी भाषेत). 2019-05-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-26 रोजी पाहिले.
  3. ^ "मूकनायकांचा संवेदनशील हुंकार". www.esakal.com. 2018-11-26 रोजी पाहिले.
  4. ^ "एलजीबीटीआय साहित्य संमेलन होणार दरवर्षी-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-26 रोजी पाहिले.
  5. ^ a b "'Not his or her story, it is time to tell our stories' - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2018-12-02 रोजी पाहिले.
  6. ^ "Coming: Maharashtra's first Marathi LGBTI literary festival on November 25". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-11-24. 2018-12-02 रोजी पाहिले.
  7. ^ "मूकनायक : समलिंगी उभयलिंगी तृतीयपंथी द्विलिंगी मराठी साहित्य संमेलन". Let's Talk Sexuality (इंग्रजी भाषेत). 2018-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-02 रोजी पाहिले.