एच.एम.एस. एक्झेटर (६८)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

एच.एम.एस. एक्झेटर ही रॉयल नेव्हीची यॉर्क वर्गाची क्रुझर होती. १९२८ ते १९३१ दरम्यान बांधली गेलेली ही युद्धनौका अटलांटिक तांड्यात शामिल केली गेली. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर एक्झेटरला दक्षिण अमेरिकेत पाठविले गेले. तेथे ये-जा करणाऱ्या व्यापारी नौकांचे जर्मन यु-बोटींपासून रक्षण करण्याची जबाबदारी एक्झेटरवर होती. प्लेट नदीच्या लढाईत ॲडमिरल ग्राफ स्पी या बलाढ्य जर्मन नौकेशी झुंजणाऱ्या क्रुझरांपैकी एक्झेटर एक होती. या लढाईत मोठे नुकसान झाल्याने ती सुमारे एक वर्ष दुरुस्तीत होती. १९४१मध्ये एक्झेटरला सिंगापूरच्या आसपास असलेल्या व्यापारी नौकांचे रक्षण करण्यास पाठविण्यात आले. तेथील जावा समुद्राच्या लढाईच्या सुरुवातीस मोठा फटका बसल्याने एक्झेटरने या लढाईतून माघार घेतली. या लढाईनंतर दोन दिवसांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करीत असताना जपानी टेहळ्यांनी तिला हेरले. लगेच धावून आलेल्या जपानी युद्धनौकांनी एक्झेटरवर हल्ला चढवला व जावा समुद्राच्या दुसऱ्या लढाईच्या सुरुवातीसच तिला जलसमाधी दिली.