एअर टांझानिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एअर टांझानिया कंपनी लिमिटेड (ATCL) या झेंडाधारी एअर लाइन कंपनीचे मुख्य केंद्र दार-ए-सलाम येथील जूलियस न्येरेरे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.

इतिहास[संपादन]

ATCL (१९७७ – २००२)[संपादन]

या विभागाला आधी पूर्व आफ्रिका एअरवेज ही विमान कंपनी विमान सेवा देत होती. तिचे विभाजन झाल्यानंतर ११ मार्च १९७७ रोजी एअर टांझानिया महामंडळ स्थापन झाले. हे पूर्णपणे देशाच्या मालकीचे आहे.

सन १९९४मध्ये, एअर टांझानिया ही एकत्रित विमान सेवेसाठी युगांडा व साऊथ आफ्रिका एअर वेज बरोबर सम्मिलीत झाली. या एकत्रीकरणात एअर टांझानियाचे १०% शेअर्स होते.[१] बोईंग 747sp आणि लहान बोईंग 767-200 या विमानाच्या मदतीने ही एअर लाइन दार एस सलाम ते एंटेबी मार्गे लंडन –हिथ्रो पर्ंत विमान सेवा देत होती. ही सम्मिलीत विमान सेवा ऑक्टोबर २००० मध्ये एकूण ५ कोटी डॉलर तोटा झाल्याने थांबविण्यात आली.

फेब्रुवारी २००२ मध्ये या ATC चे तेथील सरकारने अध्यक्षीय परस्टाटल विभागीय रिफॉर्म कमिशन मार्फत खाजगीकरण करण्याचे कामकाज चालू केले.19 सप्टेंबर 2002 या बीड देण्याच्या दिवसापर्यंत फक्त SAA यांचे बीड प्राप्त झाले. केनया एअर वेज आणि नेशन वाइड एअर लाइन्स यांनी आम्ही बीड देण्यास इच्छुक नाही असे सरकारला कळविले.[२]

ATCL (२००२ – २००६)[संपादन]

टांझानिया सरकारने साऊथ आफ्रिका एअर लाइन्सला(SAA) बीड विनर म्हणून निवडले. लिखित करारावर दोन्ही बाजूच्या सह्या झाल्यानंतर डिसेंबर २००२मध्ये SAA ने एअर टांझानियाचे ४९% भाग दोन कोटी डॉलर देऊन खरेदी केले. त्यापैकी एक कोटी डॉलर ही समभागांची किमत आणि उरलेले एक कोटी हे एअर टांझानियाचे नियोजित भांडवल आणि प्रशिक्षण योजनेसाठी म्हणून ठरले.[३]

या महत्त्वपूर्ण भागीदारीचा विचार करून SAA ने टांझानियातील दार एस सलाम हे पूर्व आफ्रिकचे मुख्य केंद्र “Golden Triangle” (सोनेरी त्रिकोण) करण्याची योजना आखली.त्यात दक्षिण, पूर्व आणि पश्चिम आफ्रिकेचा समावेश झाला. ATCL यांचेकडे असणार्‍या विमान संचाचे जागी बोईंग 737-800s, 737-200s, आणि 767-300s वापरण्याचा बेत केला. स्थानिक, मध्य पूर्व आणि पश्चिम आफ्रिका यासाठी नवीन मार्ग करण्याची योजना आखली. टांझानिया सरकारची त्यांचेकडे असणारे ५१% समभागा पैकी १०% भाग एका टांझानियाच्या गुंतवणूकदाराला विकून कांही प्रमाणात सरकारचा मालकीहक्क कमी करण्याची व ATCL मधील हितसंबंध कमी करण्याची सरकारची इच्छा होती.[३]

न्यू एअर टांझानियाचा ३१ मार्च २००३ रोजी जोहान्स्बर्ग ते दार एस सलाम ही थेट तसेच झांजिबार आणि किलिमांजारो दरम्यान विमान सेवा देऊन प्रारंभ केला.

एअर टांझानियाला खाजगीकरणामुळे पहिल्याच वर्षी कर वगळता ७३ लाख डॉलर तोटा झाला.

सुरवातीला केलेल्या नियोजनाप्रमाणे मुख्यतः दुबई, भारत, युरोपमध्ये विमान सेवा देण्याची योजना होती, पण या सेवांना उशीर झाला, कारण म्हणजे एअर टांझानियाकडे त्यासाठी एकच बोईंग 737-200s होते. विमान सेवेसाठी दूरगामी परिणामांचा अभ्यास, विकासाची योजना, जाहिरात आणि तत्पर निर्णय यांची आवश्यकता होती. पण या बाबींकडे दुर्लक्ष झाले. त्याचबरोबर दार एस सलाममध्ये पूर्व आफ्रिका हब साठी हव्या असणार्‍या सुविधा SAA सहयोग योजनेप्रमाणे जलद गतीने पुढे सरकल्या नाहीत आणि त्यामुळे हा तोटा माथी बसला.

एअर टांझानियाने त्यांच्या कांही तत्काळ विमान सेवा ३१ जानेवारी २००५ रोजी बंद केल्या आणि दार एस सलाम ते दुबई, लंडन, मुंबई आणि मस्कत या दूरच्या विमानसेवा सुरू केल्या.[४]

७ सप्टेंबर २००६ रोजी सहयोगी सदस्यांचे विचार बदलल्याने ATCL आणि SAA सामिलीकरण उद्ध्वस्त झाले.

ATCL चे पुंनर्घटन (२००७ - सध्या)[संपादन]

ATCL आणि SAA चे कायदेशीर सबंध दुरावल्यानंतर टांझानिया सरकारने SAA चे (083) ऐवजी आपले १३ अब्ज टांझानियन डॉलर त्यांच्या स्वतःच्या टिकेट(197) व्यवस्थेसाठी बाजूला ठेवले आणि रेव्हिन्यू आणि तेल पद्धत बदलली; ई-टिकेटिंग आणि लेखा पद्धत तयार केली, नवीन ट्रेड मार्क वापरला, आणि बाहेरील सर्व कर्जे भागविली. जाकया किकवेटे या अध्यक्षानी राजकीय बाबींचा अनुभव, परकीय राष्ट्रधोरणांचा अभ्यासू असा राजदूत मुस्तफा टांगणयिका यांची ATCL साठी व्यवस्थापन मंडळं (बोर्ड) अध्यक्ष आणि परस्टाताल पेन्शन निधि संचालक जनरल डेव्हिड मट्टाका यांची कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली.[५]

मालकी[संपादन]

एअर टांझानिया ही पूर्णतः टांझानिया सरकारच्या मालकीची आहे. दिनांक ३०-६-२०११ रोजी तिचे भाग भांडवल १३.४ अब्ज टांझानियन डॉलर होते.

विमान सेवा ठिकाण[संपादन]

फेब्रुवारी २०१५च्या अखेरीपासून एअर टांझानिया एक आंतरराष्ट्रीय व तीन अंतरदेशीय सेवा देत आहे.

कायदेशीर सहयोग करार[संपादन]

जून २०१४ मध्ये टांझानिया एअर लाइनचा साऊथ आफ्रिकेत दार एस सलाम ते जोहान्स्बर्ग हा सहयोग करार होता.

अलीकडेच एअर युगांडा बरोबर एंटेबी ते दार एस सलाम हा विमान सेवा करार झाला आहे.

अंतरदेशीय सहयोग करार[संपादन]

आर वांद एअर यांच्या अंतरदेशीय करार आहे. ATCL कडे ई-टिकेट इंटर लाइन करार नाही, ते पेपर तिकीट वापरतात. सामानासाठी (baggage) एअर माल्टा, गल्फ एअर,साऊथ आफ्रिकन एअरवेज आणि व्हिएतनाम एअर लाइन्स बरोबर सहयोग करार आहेत.

भविष्यातील योजना[संपादन]

ओमानी गुंतवणूक सहयोगाने आठ विमाने खरेदी करण्याची योजना आखली आहे. त्यात स्थानिक ठिकाणासाठी बोंबरडिअर, आणि बुरुंडी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द कोंगो, केनया,आणि युगांडा या सारख्या विभागीय सेवेसाठी एम्ब्राएर 175, व चीन, लंडन – हिथ्रो या आंतरराष्ट्रीय ठिकाणासाठी एअर बस A330 ही विमाने असतील.

सध्याचा विमान संच[संपादन]

कंपनीकडे जानेवारी २०१६ अखेर खालील विमान संच होता.

एअर

क्राफ्ट

सेवेत

असणारी

प्रवाशी

मर्यादा

बोंबरडिअर

CRJ 100

1 50
बोंबेरडिअर

डॅश 8-300

1 50
एकूण 2

संदर्भ[संपादन]

  1. ^ "रीजनल वर्कशॉप ऑन एअर ट्रान्सपोेर्ट रेग्युलेटरी पॉलिसी , बॅंकॉंक २०००, पेज ३" (PDF) (इंग्लिश भाषेत). २१-०४-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "एअर टांझानिया विमान सेवा" (इंग्लिश भाषेत). २१-०४-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. a b "पीएसआरसीटीझेड. कॉम" (इंग्लिश भाषेत). २१-०४-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "एटीसीएल ॲन्ड एसएए ऑफीशियली डिव्होर्स्ड" (इंग्लिश भाषेत). २१-०४-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "एअर टांझानिया शुड डू सीरियस बिझनेस" (इंग्लिश भाषेत). २१-०४-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)