एन्डेव्हर एअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एंडेव्हर एर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

एन्डेव्हर एअर अमेरिकेतील प्रादेशिक विमानकंपनी आहे. ही कंपनी डेल्टा एअर लाइन्सची उपकंपनी असून ती डेल्टा कनेक्शन या नावाने सेवा देते. १९८५मध्ये एक्सप्रेस एअरलाइन्स वन या नावाने सुरू झालेल्या या कंपनीने २००२मध्ये पिनॅकल एअरलाइन्स असे नाव घेतले. २०१२मध्ये हिच्या मुख्य कंपनीने दिवाळे काढल्यावर डेल्टा एअर लाइन्सने त्याची मालमत्ता ताब्यात घेउन हीच कंपनी एन्डेव्हर एअर नावाने २०१३मध्ये सुरू केली.

या कंपनीचे मुख्यालय मिनियापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून मुख्य ठाणी मिनियापोलिस, डीट्रॉइट, न्यूयॉर्क-लाग्वार्डिया आणि न्यूयॉर्क-जेएफके विमानतळांवर आहेत.