ईएस्पीएन क्रिकइन्फो
Jump to navigation
Jump to search
ईएस्पीएन क्रिक्इन्फो (पूर्वीचे क्रिक्इन्फो) हे फक्त क्रिकेटसंबंधी बातम्या देणारे एक संकेतस्थळ आहे. सदर संकेतस्थळावर बातम्या, लेख, क्रिकेट सामन्यांचे थेट वार्तांकन (लाइव्हब्लॉग्स आणि धावफलकासहित) आणि स्टॅट्सगुरू म्हणजेच १८ व्या शतकापासून आतापर्यंतच्या सर्व ऐतिहासीक सामने आणि खेळाडू यांचा डेटाबेस, यांचा भरणा आहे. त्याचे संपादन संबीत बाल करतात.
डॉ. सायमन किंग यांची वर्ल्ड वाईड वेबच्या अगोदरची मूळ संकल्पना असलेले हे संकेतस्थळ २००२ मध्ये विस्डेन ग्रुपने विकत घेतले. विस्डेन ग्रुपच्या नंतर झालेल्या विभागणीचा परिणाम म्हणून सदर संकेतस्थळ ईएस्पीएनला २००७ मध्ये विकले गेले, जे द वॉल्ट डिझने कंपनी आणि हर्स्ट कॉर्पोरेशन हे संयुक्त मालकीचे आहे.