Jump to content

इद्रिस एल्बा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इद्रिस अल्बा या पानावरून पुनर्निर्देशित)
इद्रिस एल्बा
Idris Elba at the Berlinale 2018
२०१८मध्ये एल्बा
जन्म इद्रिस्सा अकुना एल्बा
६ सप्टेंबर, १९७२ (1972-09-06) (वय: ५२)
हॅकनी, लंडन, इंग्लंड
राष्ट्रीयत्व इंग्लिश
नागरिकत्व युनायटेड किंग्डम, सिएरा लिऑन
शिक्षण १२वी
पेशा अभिनेता, गायक
कारकिर्दीचा काळ १९९४-
जोडीदार

हाने नोरगार्ड (१९९९-२००३; घटस्फोट) सॉन्या निकोल हॅमलिन (२००६-२००६; रद्द)

सब्रीना धौरी (२०१९ - )
अपत्ये
पुरस्कार यादी


इद्रिसा अकुना एल्बा (६ सप्टेंबर, १९७२:हॅकनी, लंडन, इंग्लंड - ) एक इंग्रजी अभिनेता, रॅपर, गायक आणि डीजे आहे. हा लंडनमधील नॅशनल यूथ म्युझिक थिएटरचे माजी विद्यार्थी असून तो दूरचित्रवाणी आणि चित्रपटांतून अभिनय करतो.

एल्बा एचबीओ मालिका द वायर (२००२-०४), बीबीसी वन मालिका ल्यूथर (२०१०-१९) या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये तसेच नेल्सन मंडेला: लाँग वॉक टू फ्रीडम या चरित्रात्मक चित्रपटातील नेल्सन मंडेला यांच्या भूमिकांसाठी ओळखला जाते. ल्यूथरसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि उत्कृष्ट मुख्य अभिनेत्यासाठी प्राइमटाइम एम्मी पुरस्कारासाठी प्रत्येकी चार नामांकने मिळाली आणि एक पुरस्कार मिळाला. [] [] []

याशिवाय एल्बा अमेरिकन गँगस्टर (२००७), ऑब्सेस्ड (२००९), प्रॉमेथियस (२०१२), पॅसिफिक रिम (२०१३), बीस्ट्स ऑफ नो नेशन (२०१५) मध्ये दिसला. बीस्ट्स ऑफ नो नेशन मधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब आणि बाफ्टा नामांकन मिळाले. मॉलीझ गेम (२०१७). द हार्डर दे फॉल (२०२१) यांतही त्याने भूमिका केल्या, एल्बाने झूटोपिया, द जंगल बुक, फाइंडिंग डोरी आणि सोनिक द हेजहॉग २ (२०२२) मधील पात्रांना आवाज दिला आहे. त्याने यार्डी (२०१८) मधून दिग्दर्शनात पदार्पण केले. []

२०१६ मध्ये एल्बाचे नाव जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या टाइम १०० यादीत होते. [] मे २०१९ पर्यंत, त्याच्या चित्रपटांनी ९.८ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त कमाई केली होती. [] एल्बा सर्वोच्च २० सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. [] अभिनयाव्यतिरिक्त, एल्बा डीजे बिग ड्रीस किंवा इद्रिस या नावाने डीजे म्हणून आणि आर अँड बी गायक म्हणून काम करतो. [] []

२०१७मध्ये एल्बा मॉलीझ गेम चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी
२००७ मध्ये एल्बा

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Lowry, Brian (10 July 2014). "Emmy Nominations 2014 — Full List: 66th Primetime Emmys Nominees". Variety. 28 January 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Wire actor Elba joins BBC drama". BBC News. 4 September 2009. 7 September 2009 रोजी पाहिले.
  3. ^ "Idris Elba". Prince's Trust. 16 March 2023 रोजी पाहिले.
  4. ^ Cabin, Chris (5 July 2016). "Idris Elba Set to Make Directorial Debut With Yardie". Collider. 7 July 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 July 2016 रोजी पाहिले.
  5. ^ Simon, David. "Idris Elba: TIME 100". Time. 26 April 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 April 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "Idris Elba Movie Box Office Results". Box Office Mojo. 6 May 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "People Index – Actors: Total Gross". Box Office Mojo. 6 May 2019 रोजी पाहिले.
  8. ^ "Idris Elba Interview: The Hustler" Archived 2017-08-07 at the Wayback Machine..
  9. ^ Canada, Danielle (13 September 2011). "Idris Elba (Driis) Releases New Music Video 'Secret Garden'". hiphopwired.com.