इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग
Appearance
(इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमीकल इंजिनिअरिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्र शासनाने १९८२ साली रासायनिक अभियांत्रिकी विभागामध्ये ४० विद्यार्थी क्षमतेसह खडकरासायनिक अभियांत्रिकी संस्थानिकेची (पूर्वीचे रायगड तंत्रविद्यानिकेतन) स्थापना केली. संस्थानिका पश्चिम पर्वतरांगांमध्ये रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेली आहे. ही एक स्वायत्त संस्थानिका आहे. लागोपाठ काही अभ्यासक्रमांची भर घातल्यानंतर आज या संस्थानिकेत आठ पद्विका अभ्यासक्रम व एक प्रगत पद्विका अभ्यासक्रम चालवले जातात.
अभ्यासक्रम | स्थापना वर्ष | विद्यार्थी क्षमता |
---|---|---|
रासायनिक अभियांत्रिकी पद्विका | १९८२ | ६० |
खडकरासायनिक अभियांत्रिकी पद्विका | १९९२ | ६० |
प्लॅस्टिक व बहुवारिक अभियांत्रिकी पद्विका | १९९२ | ६० |
उपकरणीकरण अभियांत्रिकी पद्विका | १९९४ | ६० |
विद्युत अभियांत्रिकी पद्विका | १९९५ | ६० |
अणुविद्युत व दूरसंचारअभियांत्रिकी पद्विका | १९९५ | ६० |
संगणक अभियांत्रिकी पद्विका | १९९५ | ६० |
माहिती तंत्रज्ञान पद्विका | २००१ | ६० |
जल गुणवत्ता व्यवस्थापन प्रगत पद्विका | १९९९ | ३० |
- सर्व पद्विका अभ्यासक्रम हे ए.आय.सी.टी.ई. मान्यताप्राप्त व महाराष्ट्र शासन परिचित आहेत.
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहे, बाहेरील विविध क्रियाकलाप, क्रीडा अशा सुविधा पुरवल्या जातात.
- विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्तींसाठी पात्र आहेत.
- संस्थानिकेमध्ये नोंदणीक्रूत माजी विद्यार्थी संघटना आहे, जी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रम आयोजित करते.
- संस्थानिका एक भारत सरकारची योजना सामुदायिक तंत्रविद्यानिकेतन चालवते. ज्याद्वारे विविध अल्प कालावधी कौशल्य आधारित अभ्यासक्रम उपलब्ध केले जातात.
- संस्थानिकेत प्रतिवर्षी विप्रो, पोस्को, घरडा केमिकल्स, टोयो इंजिनीअरिंग, जे. एस. डब्ल्यू. सारख्या कंपन्या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करण्याकरिता भेट देतात.