Jump to content

आरामबाग लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आरामबाग (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

आरामबाग हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील आरामबाग शहर व परिसरात स्थित असून ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ हूगळी जिल्ह्यामध्ये तर एक मतदारसंघ पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यामध्ये आहेत. २००९ सालापासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहे.

आरामबाग लोकसभा मतदारसंघ २००९ सालापर्यंत कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अनिल बसू येथून १९८४ ते २००९ दरम्यान सलग सात वेळा निवडून आले होते.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. २९ - हूगळी मध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
हरिपाल हूगळी
तारकेश्वर
पुरुशुरा
आरामबाग
गोघाट
खानाकुल
चंद्रकोणा पश्चिम मेदिनीपूर

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
२०१४ अपरूपा पोद्दार तृणमूल काँग्रेस
२०१९
२०२४ मिताली बाग

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]