अर्नाळा प्रकारच्या कॉर्व्हेट
Appearance
(आयएनएस किल्तान या पानावरून पुनर्निर्देशित)
अर्नाळा प्रकारच्या कॉर्व्हेट भारतीय आरमाराच्या युद्धनौकांचा एक वर्ग होता. या नौका मूळ रशियाच्या आरमारात पेत्या प्रकारच्या फ्रिगेटा होत्या. भारतीय आरमाराने त्यांचा उपयोग पाणबुडीविरोधी कॉर्व्हेट म्हणून केला. या वर्गातील नौकांना भारतातील समुद्री बेटांची नावे देण्यात आली होती.
भारताने रशियाकडून या प्रकारच्या एकूण अकरा नौका विकत घेतल्या होत्या. यातील पहिली नौका आयएनएस अर्नाळा २९ जून, १९७२ रोजी भारतीय आरमाराच्या सेवेत रुजू झाली होती. अर्नाळा व आयएनएस अंद्रोथ या दोन कॉर्व्हेट ९ एप्रिल, १९९२ रोजी निवृत्त झाल्या. इतर ८ नौका याआधीच निवृत्त झाल्या होत्या. आयएनएस अंदमान ही कॉर्व्हेट २२ ऑगस्ट, १९९० रोजी विशाखापट्टणमच्या २३० किमी पूर्वेस वादळात बुडाली.